अवनीचे बछडे सापडले… पण त्यांचा झाला संशयास्पद मृत्यू 

चंद्रपूर :पोलीसनामा ऑनलाईन – चंद्रपूर जिल्ह्याच्या जुनोना या जंगल परिसरात अवनी वाघिणीचे बछडे मृत अवस्थेत सापडले आहेत. रेल्वे ट्रॅक वर वाघाचे दोन बछडे मृत अवस्थेत आढळले आहेत त्यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा संशयाचे तांडव माजण्याची शक्यता आहे. अवनी वाघिणीने १३ लोकांचे प्राण घेतल्यानंतर वन विभागाच्या वतीने ठार मारण्यात आले होते. त्यानंतर तिचे बछडे गायब असल्याची बातमी आली  होती. आता या बछड्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने या मागे घातपात असल्याचे मत प्राणी मित्रांकडून व्यत्त केले जात आहे.

सुभाषचंद्र बोस यांचे ७५ रुपयांचे नाणे येणार चलनात 

अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर तिच्या हत्येमागे कट असल्याचे प्राणी मित्रांनी म्हटले होते. तर काही प्राणी मित्रांनी या घटनेला न्यायालयात आवाहन देण्याचे ठरवले आहे. तर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची बात केली होती. आता अवनीचे बछडे हि संशयास्पद मृत झाल्याने त्यांच्या मृत्यू बद्दल हि गजब व्यक्त केले जाण्याची शक्यता आहे.

आज पहाटेच्या सुमारास बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजरची धडक बसल्याने वाघाचे दोन बछडे मृत पावले आहेत अशी प्राथमिक माहिती वन विभाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र अवनीच्या बछड्याची हि शिकार वन विभागाने केली असल्याचे सर्वत्र बोलले जाते आहे. तसेच बछड्यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात वाद रंगण्याची शक्यता आहे.