Tiger Shroff And Disha Patani | ब्रेकअपनंतर टायगर आणि दिशा दिसले पुन्हा एकत्र; पॅचअपवर चाहते खुश

पोलीसनामा ऑनालाइन – बॉलीवुडमध्ये हिरो हिरोईनच्या चर्चांना नेहमी उधाण आलेले असते. (Bollywood Love Affairs) बॉलीवुडची असेच चर्चा असलेले प्रसिद्ध कपल म्हणजे टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी. (Tiger Shroff And Disha Patani) टायगर आणि दिशाने बाघी 2 (Baaghi 2) व बाघी 3 (Baaghi 3) या चित्रपटात एकत्र काम केले आहे. प्रेक्षकांना त्यांची ही जोडी आवडली आणि तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा चालू झाल्या. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आले मात्र नंतर त्यांच्या ब्रेकअप झाल्याची चर्चा पसरली आणि त्यांचे चाहते नाराज झाले. आता मात्र पुन्हा टायगर आणि दिशाला (Tiger Shroff And Disha Patani) एकत्र स्पॉट करण्यात आलेले असून त्यांच्यासोबत टायगरचे काही घरचे सदस्यही दिसले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अभिनेत्री दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff And Disha) यांचा मोठा चाहता वर्ग आहे. टायगर आणि दिशा दिल्लीतील एमएफएन इव्हेंट (MFN Event Delhi) मध्ये एकत्र सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) देखील उपस्थित होती. त्यांनी एकत्र हा कार्यक्रम एका टेबलवर बसून एन्जॉय केला. त्यानंतर दिल्ली ते मुंबईचा विमान प्रवासही त्यांनी एकत्र केला. टायगर आणि दिशाच्या पॅचअप नंतर चाहते खूश आहेत.

याआधी टायगरचे वडील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ (Actor Jackie Shroff) यांनी देखील दिशा आणि टायगरच्या रिलेशनवर (Tiger Shroff And Disha Relationship) मत व्यक्त केले होते. ते म्हणाले होते की, “टायगर आणि दिशा दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. अनेकदा मी त्यांना एकत्र पाहतो आहे. मी माझ्या मुलाच्या लव्ह-लाईफकडे लक्ष देत नाही. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मला डोकवायचं नाही. पण मला वाटतं टायगर आणि दिशा एकमेकांचे चांगले मित्र आहेत”. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर चर्चांना उधाण आले मात्र अद्याप दोघांनी प्रेमाची (Tiger Shroff And Disha Love Affair) कबुली दिलेली नाही. टायगर आणि दिशा (Tiger Shroff And Disha Patani) हे त्यांच्या कामामध्ये सध्या व्यस्त असून त्यांच्या आगामी प्रोजेक्टकडे लक्ष देत आहेत. टायगर श्रॉफ ‘बडें मियां छोटे मियां’ (Bade Miyan Chote Miyan) या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील असणार आहे. अभिनेत्री दिशा पाटनी हिने नुकतेच आलिशान घर घेतले असून ती तिच्या आगामी ‘योद्धा’ सिनेमाच्या (Yoddha Movie) तयारीमध्ये आहे.

Web Title :  Tiger Shroff And Disha Patani | disha patani tiger shroff video viral disha patani and ex boyfriend tiger shroff spotted together

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा