NIA Raid in Maharashtra | मुंबई, पुण्यात एनआयएची मोठी छापेमारी; काहीजण दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NIA Raid in Maharashtra | राष्ट्रीय तपास संस्थाने (एनआयए) राज्यात आता छापेमारी (NIA Raid in Maharashtra) करण्यास सुरूवात केली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून आज एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात (Mumbai And Pune) पाच ठिकाणी छापेमारी सुरू आहे. आईएसआईएस (ISIS) संपर्कात असलेल्या नागपाडा रहिवाशाविरुद्ध एनआयएने 28 जून रोजी गुन्हा (FIR) दाखल केला होता. याच प्रकरणातील संशय अधिक दृढ झाल्याने एनआयए कडून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

 

आईएसआईएसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंबईतील नागपाडा येथील रहिवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा झाल्यानंतर एनआयएला संशय आला की, आणखी काही जण आईएसआईएसच्या संपर्कात आहेत आणि त्यानुसार एनआयएकडून छापे (NIA Raid in Maharashtra) टाकले जात आहेत. एनआयएने पाच ठिकाणी छापेमारी (Raids At Five Locations) सुरु असून त्यामध्ये मुंबई आणि भिवंडी (Mumbai And Bhiwandi) प्रत्येकी दोन-दोन ठिकाणी आणि पुण्यात (Pune Raid) एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

 

मुंबईसह पुण्यात एनआयएकडून सर्च ऑपरेशन (NIA Search Operation) सुरू आहे. नागपाडा येथील नागपाडा पोलीस ठाण्याजवळ (Nagpada Police Station) छापा टाकण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटनेच्या (Terrorist Organization) संपर्कात होती, असा दावा एनआयएच्या सूत्रांकडून करण्यात आला आहे.

 

पुण्यातही छापेमारी –

पुण्यात एनआयए (NIA) आणि आयबी (IB) ची छापेमारी (Raid) सुरु आहे.
एनआयए आणि आयबीच्या पथकाकडून कोंढव्यात छापे टाकण्यात आले आहेत.
या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. सोमवारी पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन (Kondhwa Police Station)
हद्दीत एनआयए आणि आयबी पथकाकडून छापेमारी करण्यात आली.

 

Web Title :  NIA Raid In Maharashtra | nia raid in mumbai bhiwandi and
pune kondhwa suspected of being in contact with isis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा