#Video : नवर्‍याला गरम होत होते म्हणून पत्नीने भजी तळली चक्‍क ‘नवरत्न’ तेलात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गरम आणि उष्ण वातावरणामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. जून महिना उजाडल्यानंतरही पावसाने हजेरी लावली नसल्याने वातावरणातील उकाडा वाढला आहे. देशभराप्रमाणेच उत्तर भारतात देखील मोठ्या प्रमाणात उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. या जीवघेण्या गर्मीत माणसं पाण्यावरच जास्त जोर देत आहेत. या सगळ्यात सोशल मीडियावर या विषयासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील तुमचे हसू आवरु शकणार नाहीत. टिकटॉकवर व्हिडीओ बनवणे आजकालच्या तरुण मुलांचा खेळ झाला आहे. प्रत्येक जण त्या टिकटॉकवर व्हिडीओ तयार करत असतो.

अशाच टिकटॉकवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात भीषण गर्मीत एका पत्नीने आपल्या पतीसाठी खाण्याच्या तेलाऐवजी नवरत्न तेलात भजी तळली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत ८० लाख लोकांनी बघितला आहे. यामुळे आपल्या देशात प्रतिभा आणि कौशल्याची काहीही कमी नसल्याचे दिसते.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या देशात किती हुशार नागरिक आहेत हे देखील लक्षात येईल. मात्र त्याचबरोबर या सोशल मीडियाच्या देखील किती मोठ्या प्रमाणात हि तरुण पिढी आहारी गेली आहे हे देखील आपल्या लक्षात येईल.

अरे यह क्या बना दिया 😄😄😜😜

Geplaatst door Pure Punjabi Pb op Donderdag 2 mei 2019

 

आरोग्य विषयक वृत्त –  

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा’

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like