आतापर्यंत फक्त आमचा वापर केलाय… आता मातंग समाजाची ताकद दाखवू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. असे असताना आता उमेदवारीकरिता प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली आहे. पण प्रत्येक निवडणुकीत मातंग समाजाचा मतदानापुरता वापर सर्व पक्षाकडून केला जातो.  प्रत्यक्षात मात्र उमेदवारी दिली जात नाही याचाच निषेध म्हणून अहमगनगर येथे मातंग क्रांती मोर्चा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक दिनांक ५ रोजी होणार आहे. अशी माहिती मातंग क्रांती मोर्चाचे कोअर कमिटी सदस्य सुनील उमाप यांनी एका व्हिडीओद्वारे दिली आहे.

यावेळी बोलताना, “प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून मातंग समाजाचा फक्त मतदाना पुरता वापर केला जातो व सत्तेमध्ये कुठल्या प्रकारचे स्थान दिले जात नाही” असा आरोप उमाप यांनी केला आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेत राफेलपेक्षाही मोठा घोटाळा : पी. साईनाथ 

समाजाची ताकद दाखवू 
अहमदनगर महानगरपालिकेच्या आगामी  2018 च्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना मातंग समाज आपलं संघटन व समाजाची ताकद दाखवून देणार आहे. यासाठी येत्या सोमवारी दिनांक पाच नोव्हेंबर 2018 रोजी अहमदनगर शासकीय विश्रामग्रह येथे मातंग क्रांती मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये मातंग क्रांती मोर्चा चे सर्व कोर कमिटी सदस्य उपस्थित राहणार आहे व सर्वच राजकीय पक्षांना आवाहन करण्यात करण्यात येणार आहे की मातंग समाजाला जास्तीत जास्त उमेदवारी देण्यात यावी यासाठी प्रयत्न करून समाजातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  अशी माहिती उमाप यांनी दिली आहे.
धुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान

धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे.

आश्चर्य! नागपुरात भाजप-काँग्रेसचे एकत्र आंदोलन 

शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे.  एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत. अहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे.
शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत. दोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबर 2018 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
· नामनिर्देशनपत्रे दाखल करणे  : 13 ते 20 नोव्हेंबर 2018
· नामनिर्देशनपत्रांची छाननी      : 22 नोव्हेंबर 2018
· उमेदवारी मागे घेणे               : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत
· निवडणूक‍ चिन्ह वाटप           : 27 नोव्हेंबर 2018
· मतदान                              : 9 डिसेंबर 2018
· मतमोजणी                          : 10 डिसेंबर 2018

· निकालाची राजपत्रात प्रसिद्धी  : 13 डिसेंबर 2018 पर्यंत