Tirath Singh Rawat । मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा 4 महिन्यातच राजीनामा

उत्तराखंड : वृत्तसंस्था –  उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मार्च ,महिन्यात त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यांनतर चारच महिन्यात त्यांनी राजीनामा दिला आहे. रावत यांनी उत्तराखंडचे राज्यपाल बेबी रानी मौर्य (Governor Baby Rani Maurya) यांची संध्याकाळी भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. राजीनामा दिल्यानंतर तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिल्याबद्दल पक्षाचे आभार देखील मानले आहेत. tirath singh rawat resigns uttarakhand chief minister after four months only

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी पत्र लिहलं आहे. राजीनाम्यानंतर रावत म्हणाले की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (President JP Nadda) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे आभार मानतो आहे.
केंद्रीय नेतृत्वाने वेळोवेळी मला संधी दिली आहे. यासाठी मी नेतृत्वाचे आभार व्यक्त करतो, असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे.
तर यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होणं निश्चित आहे.
यासाठी शनिवारी भाजपच्या राज्य विधीमंडळाच्या दलाची बैठक पार पडणार असल्याचं समजते.
यात मुख्यमंत्रीपदाच्या नव्या व्यक्तीची निवड होण्याची शक्यता आहे.

 

तीरथ सिंह रावत यांनी 10 मार्च रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती..

10 मार्च रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंह रावत यांनी शपथ घेतली होती.
10 सप्टेंबरपर्यंत ते आमदार होणं आवश्यक होतं. तीरथ सिंह रावत मार्च 2021 मध्येच मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या जागेवर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती.
त्रिवेंद्र सिंह रावत यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान तीरथ सिंह रावत पौरी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना 10 सप्टेंबरपर्यंत विधानसभेचा सदस्य होणं त्यांना बंधनकारक होतं.

Web Title : tirath singh rawat resigns uttarakhand chief minister after four months only

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News । पुण्यात कला दिग्दर्शक राजू सापतेंची आत्महत्या; व्हिडीओ पोस्ट करत केले पदाधिकार्‍यावर गंभीर आरोप

Food Allergy | दूध, अंडी यासारख्या 5 हेल्दी फूड्सने होऊ शकते गंभीर अ‍ॅलर्जी, पहा यादी