25 फेब्रुवारी राशिफळ : मेष

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – तुम्हाला आजचा दिवस थोडे सांभाळून रहावे लागेल. खर्च खुप वाढतील. परंतु, धर्मकर्माच्या कामात मन लागेल. आरोग्य थोडे कमजोर राहिल. थंडी, उष्णता यापासून जपून रहा, कारण आजारी पडण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात आजचा दिवस कमजोर आहे. कामात स्थिती खुप चांगली राहिल. कुटुंबियांची साथ लाभेल. कौटुंबिक जीवन सुखशांतीचे राहिल. आज अचानक उत्पन्न वाढण्याचे योग आहेत.