Today petrol price | पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Today petrol price | तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने दरवाढ केली जात आहे. तेल कंपन्यांनी २ दिवसांच्या खंडानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आज पेट्रोल प्रति लिटर ३४ पैशांनी महागले आहे. पुण्यात पेट्रोलचा दर १०७.१६ रुपये लिटर झाले आहे. डिझेलच्या दरात लिटरमागे १६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आता डिझेलचा दर ९५.६० रुपये लिटर झाला आहे.

पॉवर पेट्रोलच्या किंमतीतही लिटरमागे ३२ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर ११०.८४ रुपये झाला आहे. देशातील महानगरांमध्येही पेट्रोल डिझेलच्यात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.५४ रुपये तर डिझेल ८९.८७ रुपये लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल १०७.५४ रुपये आणि डिझेल ९७.४५ रुपये लिटर झाले आहे. कोलकात्ता येथे पेट्रोल १०१.७४ रुपये आणि डिझेल ९३.०२ रुपये लिटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०९.८९ आणि डिझेल ९८.६७ रुपये लिटर झाले आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Today petrol price | Petrol diesel price hike again today; Find out today’s rates

हे देखील वाचा

Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या समर्थनासाठी गर्दी करणार्‍यांवर आयोजकांसह 43 नेते आणि 120 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Pregnancy Bible | करीना कपूर-खान विरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

Piyush Goyal | रेलवेमंत्री पदावरून पायउतार झालेल्या पियूष गोयल यांच्यावर भाजपानं सोपवली मोठी जबाबदारी, दिलं प्रमोशन