तिरंग्याचे रचनाकार पिंगली वेंकैया यांची आज  १४२ वी जयंती

पोलीसनामा ऑनलाईन
भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या तिरंग्याचे रचनाकार पिंगली वेंकैया यांची १४२वी आज जयंती आहे. पिंगली वेंकैया यांनी भारत देशाचा तिरंगा तयार केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली.

२ ऑगस्ट १८७६मध्ये आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्हातील भटाला पेनमरू या गावात त्यांचा जन्म झाला. भटाला पेनमरू आणि मछलीपट्टनम येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी मुंबई गाठली. शिक्षण पूर्ण झाल्यावर आल्यानंतर त्यांनी ब्रिटीश आर्मीमध्ये सैनिकी नोकरी पत्करली.  त्याच काळात त्यांनी दक्षिण अफ्रिकेत झालेल्या अँग्लो-बोअर युद्धात ब्रिटीशाच्या बाजूनं भाग घेतला.
[amazon_link asins=’B01IVTNOOU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’517982e1-965e-11e8-8b50-53b2372ce6d5′]

आफ्रिकेत गांधीजींची भेट –
दक्षिण अफ्रिकेत असताना त्यांची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत भेट झाली. भेटीचं रूपांतर मैत्रीमध्ये झाले ती पुढे ५० वर्ष राहिली. गांधीजींची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या देशाचा देखील एक स्वतंत्र ध्वज असावा, अशी कल्पना मांडली. गांधीजींना देखील ही कल्पना आवडली. त्यांनी तात्काळ राष्ट्रध्वजाचे काम पिंगली यांच्याकडं सोपवलं. त्यानंतर ते ब्रिटिश नोकरी सोडून ते राष्टध्वजावर काम करू लागले.
 
गार्ड म्हणून नोकरी –
राष्ट्रध्वजावर काम करत असताना त्यांनी काही काळ रेल्वेमध्ये गार्ड म्हणून नोकरी करू लागले. मात्र, लगेचच ही नोकरीही सोडून ते मद्रासमध्ये प्लेग निर्मूलन अभियानार्गंत सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत झाले. पिंगली वैंकेया यांना उर्दू, संस्कृत, हिंदी, जपानी भाषेच प्रचंड ज्ञान होतं. त्याचबरोबर भू-विज्ञान आणि कृषी संबधित विषयाचे ते जाणकार होते.
असा झाला तिरंग्याचा जन्म-
जवळपास त्यांनी पाच वर्ष अभ्यास केल्यानंतर राष्ट्रध्वजाची रचना तयार केली.  एस.बी.बोमान आणि उमार सोमानी यांनी पिंगानी यांना भारतीय ध्वजाची रचना करण्यात मदत केली. ध्वजात कोणते रंग वापरावे याबाबत त्यांनी गांधीजींची मदत घेतली.  ३१ मार्च १९२१ मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला. मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चरखा असावा असे सांगत चरख्यासहित हा झेंडा सादर केला तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला. आणि अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला. भारतीय संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले.
[amazon_link asins=’B01IVYYQJM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5eaf77b3-965e-11e8-93d8-1f3efbb49941′]
ही इच्छा राहिली अपूर्ण –
भारताचा तिरंगा दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पाहण्याची त्यांची इच्छा मात्र अपूर्ण राहिली.  त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्याइतके पैसे नसल्याने ते जाऊ शकले नाहीत.
कार्याचा सन्मान
१९६३ साली पिंगली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी  २००९ साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आले होते.
भारताची आण ,बाण ,आणि शान असणाऱ्या तिरंग्याच्या या रचनाकारास जयंती निमित्त पोलिसनामाकडून विनम्र अभिवादन…