आजचे राशीभविष्य – आजचा दिवस ‘या’ राशीसाठी अत्यंत लाभदायक, लग्नाचा ‘योग’ येणार

पोलीसनामा ऑनलाईन टीम –

मेष रास –

meshpng
आजचा दिवस सामान्य राहण्याची शक्यता आहे. आलेले धन तुमच्याकडे टिकून राहिल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. नोकरी करणाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या मिळतील. आज कामात अडथळे येण्याची शक्यता.

वृषभ रास –

Vrishabh
आजचा दिवस अतंत्य मंगलमय असेल. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. नवे काही तरी करण्याची इच्छा असेल, ते पूर्ण करा. कुटूंबाची जबाबदारी संभाळा, तसेच आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन रास –

mithun
श्री गणेशाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करा, दिवस चांगला जाईल. आज सर्व कामे पूर्ण होतील. कुटूंबातील सदस्याकडून आज तुम्हाला आज गिफ्ट देखील मिळू शकते.

कर्क रास –

karka
प्रेमात बुडून जाऊ नका, याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकते. नव्या कामाच्या सुरुवातीसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारात देखील आजचा दिवस शुभ असेल. दुपारची वेळ लाभकारी असेल.

सिंह रास –

sinha
कोणत्याही कार्यात संयम राखा. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम असेल. साहचारीनीपासून कोणतीही गोष्ट लपवू नका. वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

कन्या रास –

kanya
कोणाच्या कामात मध्यस्थी करु नका. अचानक आनंदाची बातमी मिळण्याचा योग आहे. धनलाभ होण्याची शक्यता. व्यापारात विचारपूर्वक निर्णय घ्या.

तुळ रास –

tula
आज अनेक असे निर्णय असतील जे तुम्ही अचानक बदलाल. आज एखाद्या गरीबाची मदत करु शकतात. व्यापारात अडचणी येण्याची शक्यता आहे. गुंतवणूक केल्यास लाभ मिळेल.

वृश्चिक रास –

vruchik
आज कोणत्याही प्रकारचा हट्ट करु नका, कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे. कामात लक्ष द्या. व्यवहारात धोका मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस दुपार नंतर चांगला असेल.

मकर रास –

MAKAR
समाजात मान- सम्मान वाढेल. कौटुंबिक जबाबदारीचे ओझे तुमच्यावर येईल. अविवाहित लोकांच्या जीवनात लग्नाचा योग आहे. गुंतवणूक करण्याचा योग आहे.

कुंभ रास –

kumbha
आजचा दिवस खूपच धकाधकीचा असेल. जुनी कामे पूर्ण करालं. संध्याकाळी एकादी अशुभ घटना कानावर येऊ शकते.

धनु रास –

dhanu
धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्याचा योग असेल. दान करण्याचा देखील योग आहे. सहाचारीनीची चांगली साथ मिळेल. पोलिस स्टेशनच्या चक्रा मारण्याची वेळ येऊ शकते.

मीन रास –

min
अत्यंत कठोर राहू नका. जशाच तसे वागा आणि आपले काम पूर्ण करा. आईचे ऐका अन्यथा अडचण येण्याची शक्यता आहे. पैशाची किंमत करा अन्यथा पश्चातापाला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

शब्दांकन – वैभव गाटे

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त