Toddler Mask | छोट्या मुलांना मास्क घालणे योग्य आहे का? ते याच्याशिवाय सुरक्षित आहेत का?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – छोट्या मुलांना मास्क (Mask) घालने खुप अवघड काम आहे. एक तर ते मास्क (Mask)  ताबडतोब काढून टाकतात किंवा घालू देत नाहीत. याच कारणामुळे सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जर मुले मास्क घालत नसतील तर ती सुरक्षित आहेत किंवा नाही?

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या छोट्या मुलांच्या चेहर्‍याला झाकू नये, किंवा असे कोणतेही मुल ज्यास श्वास घेण्यास त्रास होतो, बेशुद्ध होते, किंवा मदतीशिवाय मास्क काढण्यास असमर्थ आहे, त्यांना मास्क घालू नये.

छोट्या मुलांना मास्क का घालू नये ?
त्यांचा श्वसनमार्ग खुप लहान असतो, यामुळे मास्कसह श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. मास्क घट्ट असेल तर मुले तो काढू शकणार नाहीत. मोठी बालके आपला मास्क काढू शकतात पण ते मास्क आणि चेहर्‍याला स्पर्श करण्याची शक्यता वाढते. लहान मुलांसाठी एन95 मास्क सुद्धा नाही.

सार्वजनिक ठिकाणी मुले मास्कशिवाय सुरक्षित कशी राहतील ?

मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका. ते शक्य नसेल तर अशी काळजी घ्या…
– मुल छोटे असेल तर त्यास बेबी कॅरियरमधून घेऊन जा. मुलाला आपल्या शरीराजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
– मुलाला सीट कारमध्ये बसवून चालणे सुद्धा चांगले होईल. पण हे जड असल्याने उचलून फिरणे अवघड आहे.
– मुलाला कव्हरच्या स्ट्रोलरमध्ये ठेवा. तुमच्याकडे मुलांच्या स्ट्रोलरसाठी पावसात वापरले जाणारे प्लास्टिक शीट कव्हर असेल तर त्याचा वापर करू शकता.

छोट्या मुलांनी कशाप्रकारचा मास्क घालावा ?

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, दोन वर्षापर्यंतच्या मुलांना जर मास्क घालत असाल तर या गाईडलाईन्स आवश्य जाणून घ्या…
– मास्क मुलाच्या चेहर्‍यावर सहजपणे फिट बसावा, विशेषकरून गालांच्या बाजूने.
– मास्कमध्ये ईयर लूप्स असावेत.
– मास्कमध्ये किमान 3 लेयर असावेत.
– विना अडथळा मुलाला सहज श्वास घेता यावा.
– मशीनमध्ये धुता येईल आणि कोणत्याही नुकसानीशिवाय सुकवता येईल.

मुलांना मास्क घालण्याच्या पद्धती
यात काहीच शंका नाही की छोट्या मुलांना मास्क घालणे अतिशय अवघड काम आहे, परंतु यास तुम्ही सोपे सुद्धा करू शकता. तुम्ही मुलाला स्वता मास्क निवडण्यासाठी सांगू शकता किंवा त्यांचा मास्क पेंट करू शकता. कपड्यांसोबत मॅचिंग मास्क घ्या. अशापद्धतीने मुल मास्क घालेल.

हे देखील वाचा

4 तप ‘सत्तेच्या पडछायेत’ असणारा प्रशासक काळाच्या पडद्याआड ! माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन

9 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ, ग्रह-नक्षत्राची मिळेल पूर्ण साथ, इतरांसाठी असा आहे बुधवार

ट्विटर ला देखील फॉलो करा