स्वप्नातलं घर घेणं झालं सोप्प ! पर्सनल लोन पेक्षा ‘टॉप अप’ होम लोन स्वस्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घर घेणं हे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू जेव्हा कर्ज घेण्याची वेळ येते तेव्हा लोक पर्सनल लोन घेण्याचा विचार करतात. याचे कारण तुम्हाला बँक लगेचच कर्ज देते. परंतू तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर घेऊ इच्छित असाल आणि त्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला पर्सनल लोन शिवाय इतर स्वस्त पर्याय महित असणे आवश्यक आहे. स्वस्त व्याज घेण्यासाठी तुम्ही गृहकर्जावर टॉप अप कर्ज घेऊ शकतात. जर तुम्ही गृह कर्ज घेतले असेल तर त्यावर तुम्ही सहज टॉप अप करु शकतात. टॉप अप कर्जाचे व्याज दर गृह कर्जाच्या व्याजापेक्षा आधिक असतात. परंतू पर्सनल लोन पेक्षा बरेच कमी असतात.

ज्या प्रकारे तुम्ही मोबाइल फोनचे टॉप अप रिचार्ज करतात आणि तुमच्या फोन मध्ये बॅलेंस येतो त्याच प्रकारे गृहकर्जाला टॉप अप करु शकतात. होम लोनचे टॉप अप लोन देखील ३० वर्षांच्या काळासाठी घेऊ शकतात. गृह कर्ज घेतल्यानंतर काही दिवसांनंतर तुम्ही हे लोन घेऊ शकतात. बँक तुम्हाला गृह कर्जाच्या रीपमेंटचा पॅटर्न पाहून तुमचे टॉप अप लोन घेऊ शकतात. हे वास्तवात एका पर्सनल लोन सारखेच असते. हे तुम्ही घराच्या गरजांसाठी घेऊ शकतात.

टॉप अप लोनचा वापर कोणत्याही उद्देशासाठी केला जाऊ शकतो. जर घराचे नुतनीकरण करु इच्छित आहेत तर आयकरचा देखील लाभ मिळेल. टॉप अप लोनचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी किंवा अतिरिक्त प्रॉपर्टी खरेदीसाठी करु शकतात. हे लोन गृह कर्जाच्या अतिरिक्त असते, यामुळे गृह कर्ज फेडताना टॉप अपचे मासिक हप्ते देखील फेडावे लागतात. SBI च्या टॉप अप लोनचे व्याजदर वर्षाला ११.६५ टक्के आहे.

बॅक आणि व्याजदर –
एचडीएफसी – ८.५५ ते ९.५५
युनियन बँक ऑफ इंडिया – ९.७० – ९.८५
स्टेट बँक ऑफ इंडिया – ८.८५ – ११.६५
बँक ऑफ बडोदा – ९.१० – १०.३५
युनायटेड बँक ऑफ इंडिया – ११.५५
अॅक्सिस बँक – ८.९० – ११.८५
कॅनेरा बँक – ९.१
बँक ऑफ इंडिया – ९.२५ – ९.३०

आरोग्यविषयक वृत्त –