…म्हणून पुणे – मुंबई महामार्गावर होतेय वाहतूक कोंडी !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्या चांदणी चौकातील बहुमजली पुलाचे काम सुरू आहे. परिणामी हिंजवडी, मुंबई बाजूला जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सोमवारी सकाळी हिंजवडी, मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर अधिक गर्दी होते. दररोज येथे गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होते. रविवारी दुपारी संध्याकाळी वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या.

दरम्यान, रविवारी दुपारी वाहुतक कोंडी कोथरुड पुलापर्यत पोचली होती. संध्याकाळी ती वेदभवन खिंडीपर्यंत पोचली होती. सोमवारी सकाळी हिंजवडी, मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. मुळशी बाजूने साताऱ्याकडे जाणारा महामार्गावर उड्डाणपूल उतरतो. त्याचे काम सुरू आहे. तेथील पुलाचा खांब उभारण्याचे काम सुरू आहे. खांबाच्या शेजारी कडेला पत्रे लावले आहेत. तसेच, डाव्या बाजूला देखील पत्रे लावलेले आहेत. परिणामी तीन मार्गिका(लेन) ऐवजी दोन मार्गीका असल्याने असल्याने रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होते.

वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महामार्गावर बावधन परिसरात पुलाच्या कामामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होते. त्याचा फुगवटा मागे एक- दीड किलोमीटर पर्यत वाढत जातो. तो परिसर हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्याबाजूला वाहतूक कोंडी झाल्यास आम्ही त्याची माहिती देतो.”