अमरावती महापालिका आयुक्त हेमंत पवार यांची बदली

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन

अमरावती महापालिकेचे आयुक्त हेमंत पवार यांची बदली करण्यात आली असुन त्यांच्या ठिकाणी संजय निपाने यांची आज (मंगळवार) रोजी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. संजय निपाने यांनी याआधी ठाणे महानगरपालिका उपायुक्त म्हणुन कार्यभार सांभाळला होता.त्यांना उपायुक्त या पदावरुन कार्यमुक्त करुन आयुक्त पदावर बढती देत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अमरावती महानगरपालिका आयुक्त या पदावर नव्याने संजय निपाने यांना दि. १२ जून, २०१८ (मंगळवार) पासून त्यांच्या सध्याच्या पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांना दि.१३ जून,२०१८ (बुधवार) पासून आयुक्त पदावर बढती देण्यात आली असून त्यांना पदभार स्विकारण्याचे आदेश दिले आहेत.यापुर्वी निपाने यांनी उप. आयुक्त (मुख्यालय) – आपत्ती व्यवस्थापन, आय.टी., ई-प्रशासन, सर्वसाधारण प्रशासकीय, आस्थापना, कार्मिक, मागासवर्गीय, सुरक्षा, अग्निशमन दल, सेन्स,घनकचरा व्यवस्थापन (प्रकल्प), नागरिक सुविधा केंद्र ईत्यादी पदावर त्यांनी कार्यभार सांभाळला होता.