देशात ‘मॉब लिंचिंग’चे सत्र चालूच ; त्रिपुरा राज्यात ‘गो तस्करी’च्या संशयावरून युवकाची हत्या

आगरतळा : वृत्तसंस्था – देशामध्ये सुरु असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना वाढतच चालल्या आहेत. झारखंडनंतर आता उत्तर पूर्वेकडील त्रिपुरा राज्यात मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. त्रिपुरा राज्यातील धलाई जिल्ह्याच्या रायसैबारी गावात एका आदिवासी व्यक्तीला जमावाकडून जबरदस्त मारहाण करून हत्या केली. मंगळवारी रात्री ही घटना घडली. ही व्यक्ती गायीची तस्करी करत असल्याचा संशय घेऊन व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ही आदिवासी व्यक्ती त्रिपुराची राजधानी आगरतळा पासून १५० किलोमीटर लांब असलेल्या एका आदिवासी गावातील असून त्या व्यक्तीचे नाव ज्योति कुमार त्रिपुरा असे आहे. या व्यक्तीचे वय ३६ वर्ष आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बुधी या व्यक्तीला रात्री गायींच्या कळपात जाताना काहींनी पाहिले. बुधी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्याला पकडण्यात आले. जमावाकडून त्याला जबरदस्त मारहाण करण्यात आली. गाईंची तस्करी करत असल्याचा संशय या व्यक्तीवर जमावाने घेतला. म्हणूनच या व्यक्तीला मारहाण करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच रायबाडी पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी पोहचले. बुधीला स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण त्याने हॉस्पिटलमध्येच अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी यापेक्षा अधिक माहिती देण्यास नकार दिला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

जातिवाचक शिवीगाळ करणे पडले महागात, मुख्याध्यापिका आणि वर्ग शिक्षिकेला कैद

युती, आघाडीच्या अडचणी वाढल्या ;वंचित’ यामुळे बदलणार या पाच मतदारसंघांचं गणित

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

You might also like