TRP Scam : पार्थो दासगुप्ता TRP घोटाळ्याचा घोटाळ्याचा मास्टरमाइंड – मुंबई पोलीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचा (BARC) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता हा टीआरपी घोटाळ्याचा (TRP Scam) मास्टमाइंड असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दासगुप्ताला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 28 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. टीआरपी घोटाळ्यातील ही 15 अटक असून, गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (CIU) अधिक तपास करत आहे.

मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने टीआरपी घोटाळ्याप्रकरणी बर्कचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दासगुप्ता याला गुरुवारी (दि.24) रायगड येथून बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला न्यायालयाने 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दासगुप्ता हाच टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक या वाहिनीचा टीआरपी कृत्रिमरीत्या वाढवण्याच्या घोटाळ्यात दासगुप्ताचा सहभाग असल्याच ठपका ठेवण्यात आला आहे. फेक टीआरपी प्रकरणातील तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी भांदवी कलम 409, 420, 465,468,406,120 (ब), 201, 204, 212 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आतापर्यंत याप्रकरणी 14 आरोपींना अटक करण्यात आली असून गुरुवारी अटक करण्यात आलेली ही 15 वी अटक आहे.