विनयभंगाची तक्रार दाखल करणाऱ्या मुलीशी पोलिसाची गैरवर्तवणूक (व्हिडीओ)

कानपुर : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील कानपुर जिल्ह्याच्या नाझीराबाद पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या मुलीशी पोलिसाकडून गैरवर्तणूक करण्यात आली आहे. पोलीसाने या मुलीला म्हंटले की, ‘तु अंगठ्या, बांगड्या आणि लॉकेट का घातले आहे? यावरून तू कोण आहे हे कळते. अशाप्रकारे पोलिसांनी मुलीची तक्रार ऐकून न घेता तिचा अपमान केला.

मुलगी आणि पोलीस यांच्यातील हा सर्व संवाद कॅमेरात कैद झाला आहे. यासंबंधी व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून मुलीसोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या पोलिसांवर जोरदार टीका होत आहे. या व्हिडिओमध्ये मुलगी तिची तक्रार पोलिसांना सांगत आहे. मुलगी पाणी भरत असताना एका टोळक्याने तिचा विनयभंग केला आणि ते तिच्या भावाने मुलीचा भाऊ आणि तो मुलगा यांच्यात मारहाण झाली. अमर तिवारी, आशिक, विकी लंगर यांनी त्या मुलीचा विनयभंग केला.

संबंधित मुलीने पोलीस स्थानकात पोलिसांनी सांगितले, ‘तुम्ही या सर्व रिंग्ज, बांगड्या आणि लॉकेट का घातल्या आहेत? इथे काही उपयोग आहे का? पोलिसांना घटनेची गांभीर्याने दखल न घेता घडलेल्या घटनेस मुलीच्या पालकांना दोष दिला. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर लोक त्या मुलीच्या बाजूने उभे राहिले आणि पोलिसांविरुद्व लोकांनी आवाज उठविला.

आरोग्यविषयक वृत्त –