Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंचा पदभार स्वीकारताच धडाका, रुग्णालयात रात्री डॉक्टर नसल्यास थेट निलंबन, धाडसत्र सुरु

पुणे : काही दिवसांपूर्वी आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. (Dr. Ramaswamy N.) यांच्याकडून तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आयुक्त आरोग्य सेवा (Commissioner Health Services) आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. राज्यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध राहण्याच्या सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या. त्यांनतर आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेच्या (Tukaram Mundhe) कामाचा धडाका सुरू झाला आहे.

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Centre), ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital), जिल्हा रुग्णालय (District Hospital) येथे काल रात्री दीडच्या सुमारास आरोग्य उपसंचालक (Deputy Director of Health), जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer), वरिष्ठ डॉक्टर (Senior Doctor) यांनी धाडसत्राला सुरुवात केली. पुण्यातील आळंदी (Alandi), वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता तेथे डॉक्टर उपस्थित असल्याने कारवाई टळली.

रुग्णालयांची पाहणी केल्यावर डॉक्टर उपस्थित नसल्यास निलंबनाची (Suspension) कारवाई होणार असल्याचा इशारा मुंढे (Tukaram Mundhe) यांनी दिला आहे.
राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांना शिस्त लागावी.
तसेच ती पूर्ण कार्यक्षमतेने सुरु व्हावीत अशी अपेक्षा आहे, असे मुंढे यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असून शासकीय आरोग्य संस्था 24 तास कार्यरत राहतील,
आरोग्य सेवांपासुन राज्यातील कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश मुंढे यांनी दिले होते.
ग्रामपातळी पर्यंत सार्वत्रिक, सहज व माफक आरोग्य सेवा राज्यातील जनतेला पूरविण्याच्या दृष्टीने आरोग्याच्या सर्व निर्देशांकांवर उत्कृष्ठ कामाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title :- Tukaram Mundhe | direct suspension if the doctor is not present at the hospital at night as soon as he took office tukaram mundhe burst

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | पोलीस दल हे इंग्रज काळातील नाही, जनतेचे सेवक म्हणून काम करा; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांना सल्ला

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देणार – दीपक केसरकर

MNS | उद्धव ठाकरेंकडून दीड वर्षीय बाळाचा उल्लेख, मनसेनं करुन दिली बाळासाहेबांची आठवण

Chandrakant Patil | ‘आमचा उत्स्फुर्त उठाव होता’ चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटाच्या मंत्र्याचे प्रत्युत्तर