Chandrakant Patil | ‘आमचा उत्स्फुर्त उठाव होता’ चंद्रकांत पाटलांच्या दाव्याला शिंदे गटाच्या मंत्र्याचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन अडीच वर्ष मी सरकार येणार म्हणत होतो, मी काय वेडा नव्हतो असं बोलायला. आम्ही सर्व प्लॅनिंगमध्ये होतो. 40 जणांना बाहेर काढणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठीची यंत्रणा माझ्या मनात होत्या. असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल पुण्यातील एका कार्यक्रमता केला होता. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या दाव्याला शिंदे गटाचे प्रवक्ते (Shinde Group Spokesperson) आणि मंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दीपक केसरकर म्हणाले, आम्ही अशा पद्धतीचे कोणतेही प्लॅनिंग केले नव्हते. हा आमचा उत्स्फुर्त उठाव होता. आमचा हा उठाव काही तत्वांसाठी होता. आमचं या संदर्भात अगोदर कोणतही प्लॅनिंग नव्हते, असं केसरकर यांनी सांगितलं.

भाजपचे (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल काल पुण्यात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
त्यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापनेतील काही किस्से सांगितले.

आपापसातील भांडाभांड बंद करा

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत (Municipal Elections) 100 नगरसेवक निवडून आले तरच,
भाजपने पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) जिंकली असे मी मानेन.
99 नगरसेवक आल्यावर महापौर (Mayor) आपला होईल.
पण भाजपने महापालिका जिंकली असे मी कधीच म्हणणार नाही.
त्यामुळे आपापसांतील भांडाभांड बंद करा अशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं.

Web Title :- Chandrakant Patil | minister deepak kesarkar responded to shivsena party split claim made by bjp leader chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS | उद्धव ठाकरेंकडून दीड वर्षीय बाळाचा उल्लेख, मनसेनं करुन दिली बाळासाहेबांची आठवण

Shimron Hetmyer | ‘प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते,’ शिमरॉननं रिपोस्ट केली स्टोरी

Madhuri Misal | माधुरी मिसाळ यांनी सत्य मांडताच कार्यकर्ते खुश, म्हणाल्या – ‘चंद्रकांतदादा, पुण्यातील नेते मंडळी तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना…’