फक्त 17 लाखात विकली गेली ‘रॅपर’ तुपैक शकूरची हत्या केलेली कार

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – लास वेगस येथे 7 सप्टेंबर 1996 मध्ये अमेरिकी रॅपर तुपैक शकूर हा बीएमडब्ल्यू गाडीत बसला असताना त्याची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. तुपैक शकूरला मारण्यासाठी गाडीवर मारण्यात आलेल्या चार गोळ्यांची छिद्र आजही गाडीवर स्पष्ट दिसतात. या गाडीचा लिलाव करण्यात आला. लिलावात अवघ्या 17 लाखांना ही कार विकण्यात आली.

तुपैक शकूरचे कमी वयात तब्बल 75 मिलियन अल्बम विकले गेले आहेत. त्याचा हा मोठा विक्रम मानला जातो. सर्वाधिक अल्बम विकले जाणारे जे कलाकार आहेत, त्यामध्ये तुपैक शकूरच्या नावाचा समावेश आहे. तुपैक शकूर हा 7 सप्टेंबर 1996 रोजी त्याच्या काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू 7 सीरिज गाडीत बसला होता. त्यावेळी आलेल्या अज्ञात मारेकर्‍यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तुपैक शकूर गंभीर जखमी झाला होता. तसेच त्याच्या गाडीवरही तीन गोळ्या लागल्या होत्या. गंभीर जखमी आवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सहाव्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.

तुपैकची हत्या कोणी केली याचा शोध अद्यापपर्यंत पोलिसांना घेता न आल्याने त्याच्या मारेकर्‍यांची ओळख पटू शकलेली नाही. ही हत्या कोणी केली हे गुढ अजूनही कायम आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/