पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकविणारी भारतीय सैन्याची स्पेशल फोर्स आता ‘या’ देशाच्या सैन्यास देणार प्रशिक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकविणाऱ्या भारतीय सैन्याच्या स्पेशल फोर्सबाबत आपणा सर्वाना अभिमान आहे. ज्यांना एसएफ म्हणून देखील ओळखले जाते. देशाची स्पेशल फोर्स आपली मारक क्षमता, कौशल्य आणि ऑपरेशनची अचूकता आणि बलिदानासाठी जगातील सर्वोत्तम फोर्सपैकी एक मानली जाते. भारतीय सैन्याच्या या स्पेशल तुकडी कडून (एसएफ) कौशल्य आणि स्ट्राईक क्षमता शिकण्यासाठी युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया, मध्य आशियाई आणि मध्य पूर्व, सहयोगी दलांच्या विशेष दलाने शिकण्यात रस दर्शविला आहे. यानंतर, शत्रूविरूद्ध आपल्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय स्पेशल फोर्स मित्र राष्ट्र सैन्याला युद्धाचे कौशल्य शिकवत आहे.

तुर्कमेनिस्तानच्या विनंतीच्या आधारावर, भारतीय लष्कराचे स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल ( SFTS) ने तुर्कमेनिस्तान स्पेशल फोर्सेसला पॅराट्रूपर्स प्रशिक्षण देऊन याची सुरुवात केली जाते. दहशतवाद्यांशी लढा देण्यासाठी, छुप्या कारवाई करण्यासाठी भारतीय सैन्याची ही विशेष सेना त्यांना प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दीष्ट तुर्कमेनिस्तानच्या स्पेशल फोर्सेसची क्षमता वाढवणे आणि त्यांना अधिक मारक बनवणे आहे. दरम्यान, सैनिकी हित लक्षात घेऊन 1962 मध्ये झालेल्या पराभवानंतर 1965 मध्ये देशात स्पेशल फोर्सेसची स्थापना झाली होती.

2016 मध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईक व्यतिरिक्त या स्पेशल फोर्सच्या कामगिरीवर नजर टाकल्यास या दलाने म्यानमारमध्ये विशेष ऑपरेशन केले. एसएफच्या या कारवाईत अनेक अतिरेकी ठार झाले. याआधी 1971 च्या पाकिस्तान युद्धातही स्पेशल फोर्सेसनेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या व्यतिरिक्त 1990 साली काश्मीरमधील अशांतता आणि कारगिल युद्धाचा अंत करण्यासाठीही या विशेष सैन्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.