हळदीचे 3 हेअरपॅक, हिवाळयात केस नाही होणार ड्राय अन केस गळती देखील होईल बंद !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  या हंगामात वाहणारे थंड वारे केवळ त्वचाच नव्हे तर केसांवरही परिणाम करतात. यामुळे केस निर्जीव, कमकुवत आणि कोरडे होते. जरी याकरिता बरीच उत्पादने बाजारात असतील तरी आपण या समस्या घरगुती मार्गाने देखील सोडू शकता. हळदीच्या बनवलेल्या काही पॅकने.

हळद का फायदेशीर आहे?

१) हळद एंटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांसह समृद्ध आहे आणि केवळ आरोग्यासाठीच नाही तर कोणत्याही औषधापेक्षा ती कमी नाही. हळदीचे पॅक वापरल्याने टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढते यामुळे केसांवर मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे.

२) कोंडा आणि डोक्यातील इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो. त्यात एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. याशिवाय हळद पॅक केसांचा रंग गडद करण्यासही उपयुक्त आहे.

हळद पॅक कसा बनवायचा जाणून घ्या

१) दही, अंडी आणि हळद हेअर पॅक

यासाठी २ चमचे हळद मध्ये २ अंडी त्यातील पांढरा भाग, २ चमचे दही मिसळा आणि टाळूवर लावा. १ तासानंतर ताज्या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून एकदा हे हेअर पॅक वापरुन आपल्याला फरक जाणवेल.

२) दूध, हळद, कोरफड हेअर पॅक

४ चमचे हळद, एलोवेरा जेल आणि १/२ कप दुधात मिसळा. हे केसांच्या मुळांवर लावून ३० मिनिटांसाठी तसेच राहू द्या. नंतर ताजे पाणी आणि सौम्य शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा पॅक वापरल्यास फायदा होईल.

३) नारळ हळद हेअर पॅक

हळदीमध्ये २ चमचे नारळ तेल गरम करून टाकावे. नंतर कोमट झाल्यावर केसांना लावा आणि ३० मिनिटांनंतर केस धुवून टाका. आठवड्यातून २ वेळा हा पॅक वापरा.