तुषार कपूरने लग्न का केलं नाही?, म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – २००१ मध्ये ‘मुझे कुछ कहना है’ चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने Tusshar Kapoor डेब्यू केला होता. ‘कुछ तो है’, ‘गायब’, ‘खाकी’ असा काही सिनेमात झळकल्यानंतर ‘क्या कूल है हम’ या चित्रपटामुळे त्याला विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर गोलमाल सिरीजमुळे तो आणखी लोकप्रिय झाला. तुषार कपूर Tusshar Kapoor हा दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि निर्मात्या शोभा कपूर यांचा धाकटा मुलगा. त्याची मोठी बहीण एकता कपूर प्रख्यात चित्रपट निर्माती आहे. एकताही अविवाहित आहे. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत एकतानेही २०१९ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला. तुषारने बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन नुकतीच वीस वर्ष झाली.

कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ सरकारी बँकेत पैसे गुंतवा, आगामी 6 महिन्यात मिळतील 60 टक्क्यांहून जास्त रिटर्न, जाणून घ्या

मात्र, ४४ वर्षाच्या तुषारने अद्याप लग्न केलेले नाही. पण तो एका मुलाचा बाप आहे. सरोगसीच्या माध्यमातून त्याने मुलाला जन्म दिला. आता तुषारचा मुलगा ५ वर्षांचा होईल. अर्थात अद्यापही लग्न कधी करणार? असा प्रश्न तुषारला केला जातो. पण तुषारचे म्हणाल तर तो ठाम आहे. होय, लग्न न करण्याच्या निर्णयावर तो ठाम आहे. मी सिंगल आहे आणि यातच आनंदी आहे. आत्ताच नाही तर भविष्यातही लग्न करण्याचा माझा कुठलाही इरादा नाही. लग्न न करण्याच्या निर्णयावर मी ठाम आहे. खरं सांगायचे तर मी स्वत:ला अन्य कुणासोबत शेअर करू इच्छित नाही. मी बाप आहे. माझा मुलगा लक्ष्य रोज मला काहीतरी नवीन शिकवत असतो. याशिवाय कुठला पर्याय मला निवडायचा नाही. मी स्वत:ला इतरांसोबत शेअर करु शकत नाही, असे तुषार म्हणाला.

‘या’ देशात मिळतंय फक्त 1. 46 रुपये प्रति लिटर पेट्रोल, जाणून घ्या कारण

तुषार कपूर जून २०१६ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून पिता झाला. तो एकटा मुलाला सांभाळत आहे. सिंगल फादर बनण्याचा अनुभवही त्याने शेअर केला. मुलासोबत माझा दिवस कसा जातो, मलाही कळत नाही. माझा मुलगा हाच माझे जग आहे. सिंगल पॅरेंट बनण्याच्या निर्णयाबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. यापेक्षा दुसरा चांगला निर्णय असूच शकला नसता. मी योग्य वयात, योग्य निर्णय घेतला, असे तो म्हणाला.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ सरकारी बँकेत पैसे गुंतवा, आगामी 6 महिन्यात मिळतील 60 टक्क्यांहून जास्त रिटर्न, जाणून घ्या