Tusshar Kapoor | अभिनेता तुषार कपूरच्या सर्वात जास्त आहेत A ग्रेड सर्टिफिकेट मुव्हीज्

पोलीसनामा ऑनलाइन – Tusshar Kapoor | चित्रपटांना मिळणाऱ्या सर्टिफिकेटची चर्चा यापूर्वी जास्त केली जात नव्हती. मात्र अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित ओव्ह माय गॉड 2 (OMG 2) या चित्रपटाला सेंसर बोर्डकडून मिळालेल्या A ग्रेड प्रमाणपत्रामुळे हा विषय चर्चेत आला आहे. मात्र या आधी देखील अनेक चित्रपटांना A ग्रेड प्रमाणपत्र (A Grade Certificate Movie) मिळाली आहेत. बॉलीवुडमधील या यादीमध्ये प्रसिद्ध स्टार किड असलेला अभिनेता तुषार कपूरचे (Tusshar Kapoor) नाव या सर्वात जास्त वेळा आहे. अभिनेते जितेंद्र (Actor Jitendra) यांचा मुलगा तुषार कपूर याचे अनेक A ग्रेड सर्टिफिकेट असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

सेंसर बोर्ड तर्फे कोणताही चित्रपट प्रदर्शनापूर्वी तो पाहून त्याला सर्टिफिकेट दिले जाते. A ग्रेड सर्टिफिकेट असेल तर तो चित्रपट फक्त प्रौढ व्यक्तीच पाहू शकते. 18 वर्षाखालील कोणालाही हा सिनेमा पाहता येत नाही. याचा परिणाम लहान मुलांवर होऊ शकतो म्हणून चित्रपटाला A ग्रेड प्रमाणपत्र दिले जाते. अभिनेता तुषार कपूरने (Tusshar Kapoor A Grade Movies) असे अनेक चित्रपट केले आहेत. त्याचा 2016 साली प्रदर्शित झालेला क्या कूल हैं हम 3 (Kyaa Kool Hain Hum 3) हा चित्रपट देखील गाजला होता. यामध्ये तुषार सोबतच कृष्ण अभिषेक (Krushna Abhishek), मंदाना करीमी (Mandana Karimi), आफताब शिवदासानी (Aftab Shivdasani) हे कलाकार देखील होते. चित्रपटाची कहाणी ही अतिशय रंजक व मजेशीर होती. यामध्ये थायलंडमध्ये राहणारा अॅडल्ट फिल्म्समध्ये काम करणारा अभिनेत्याला परंपरांचे पालन करणाऱ्या मुलीवर प्रेम होते. आणि तिची लग्नासाठी एक अट असते की ती ज्याचे पूर्ण कुटुंब असेल त्याच्यासोबत लग्न करेल. येथून चित्रपटात गंमत सुरु होते.

तुषारचा आणखी एक चित्रपट म्हणजे 2016 साली आलेला ‘मस्तीजादे’ (Mastizaade). यामध्ये अभिनेता तुषार कपूर सह सनी लिओन (Sunny Leone), अभिनेता वीर दास (Vir Das), गिझेल ठकराल (Gizele Thakral) या कलाकारांनी भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथेमध्य़े दोन बहिणींच्या प्रेमाच्या जाळ्यात दोन मुले अडकतात. आणि त्यानंतर दीड तास हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. चित्रपटामध्ये अनेक कॉमेडी सीन देखील आहे. तुषार कपूरचा ‘शूटआउट एट वडाला’ (Shootout At Wadala) हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. मात्र चित्रपटाला बोर्डकडून A सर्टिफिकेट मिळाले होते. वास्तवदर्शी घटनांवर आधारित असलेल्या हा चित्रपट गॅंगस्टर मन्या सूर्वे (Gangster Manya Surve) वर आधारित होता. यामध्ये अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि कंगना राणौत (Kangana Ranaut) यांनी भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये खूप फायटिंग आणि रक्तरंजीत सीन असल्यामुळे चित्रपटाला A प्रमाणपत्र मिळाले.

मुलीला इम्प्रेस करण्यासाठी अभिनेता त्याच्या मित्रांसह एक खोटं कुटुंब तयार करतो. चित्रपटाची कहानी चांगली असली तरी इंटिमेट सीन (Intimate Scene) असल्यामुळे चित्रपटाला A ग्रेड प्रमाणपत्र देण्यात आले.

तुषार कपूरच्या (Tusshar Kapoor) 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture)
या चित्रपटाची देखील खूप चर्चा झाली होती. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते.
या मध्ये अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिची भूमिका आणि बोल्डनेस (Vidya Balan Boldness) लक्षवेधी ठरला होता.
यामध्ये इमरान हाश्मी (Emraan Hashmi), नसरुद्दीन शहा (Naseeruddin Shah)
या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rashami Desai | अभिनेत्री रश्मी देसाई अनेक दिवसांपासून दिसत नसल्याने तिला मुलं असल्याच्या अफवा; खरे नाव देखील आहे वेगळेच