Rashami Desai | अभिनेत्री रश्मी देसाई अनेक दिवसांपासून दिसत नसल्याने तिला मुलं असल्याच्या अफवा; खरे नाव देखील आहे वेगळेच

पोलीसनामा ऑनलाइन – हिंदी मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून रश्मी देसाईला (Rashami Desai) नावाजले जाते. रश्मीने मालिकांपासून चित्रपटांपर्यंत अनेक माध्यमांमध्ये काम केले असून तिची लोकप्रियता अफाट आहे. अभिनेत्री रश्मी देसाईने मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली असल्यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. तिने अगदी लहान वयापासून मनोरंजन विश्वामध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. रश्मीच्या (Rashami Desai) लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अभिनेत्री रश्मी देसाई हिचे लग्न, घटस्फोट, मुलं आणि तिचं खरं नाव (Rashami Desai Real Name) अशा तिच्या आयुष्याच्या काही पैलूंबद्दल आज जाणून घेऊया.

मालिकांमुळे (Rashami Desai TV Show) घराघरात पोहचलेली अभिनेत्री रश्मी देसाई ही तिच्या सहज व जीवंत अभिनयामुळे नावाजली जाते. तिची ओळख आता सर्वदूर पसरली आहे. असे असले तरी रश्मी देसाईचे खरे नाव रश्मी हे नाहीये. अनेकांना हे माहिती नाही की रश्मी देसाईचे खरे नाव शिवानी देसाई (Shivani Desai) आहे. तिचा जन्म 13 फेब्रुवारी 1986 रोजी झाला असून ती मुळची आसामची (Assam) आहे. तिने 2006 साली ‘रावण’ या मालिकेतून मनोरंजन विश्वामध्ये एन्ट्री केली आणि तिची घौडदौड आजतागयत सुरु आहे. अनेक हिट चित्रपट, मालिका, गाण्यांमध्ये तिने काम केले आहे.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती सिनेविश्वापासून जरा लांब गेलेली दिसत असून अनेक महिन्यांपासून ती कोणत्याही प्रोजेक्टमध्ये झळकलेली दिसून आली नाही. यामुळे तिच्या चाहत्यांना ती सध्या काय करत आहे असा प्रश्न पडला आहे. अनेकांनी तिला बाळ (Rashami Desai Baby) असून ती सध्या त्यांचा सांभाळ करत आहे अशी अफवा देखील पसरवली आहे. अनेकांना असे वाटते की अभिनेत्री रश्मी देसाई हिला मुले आहेत. मात्र ही फक्त अफवा असून तिला कोणतेही मुलबाळ नाही. मात्र रेश्मीच्या भावाला दोन मुले आहेत. आणि रश्मी ही त्याच्या खूप प्रेम करताना दिसून येते. तिच्या मुलांप्रमाणे रश्मी ही तिच्या भावाच्या मुलांचा लाड करते. अभिनेत्री रश्मी देसाई हिचे लग्न (Rashami Desai Marriage) झाले होते मात्र ते जास्त काळ टिकले नाही.

अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) हिचे अभिनेता नंदीश संधू (Nandish Sandhu) याच्यासोबत 2012 साली विवाह झाला होता. मात्र रश्मीचे हे नाते जास्त काळ टिकले नाही आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय (Rashami Desai Divorce) घेतला. रश्मी आणि नंदीशने अगदी चार वर्षात त्यांच नाते संपुष्टात आणले. पुढे घटस्फोटानंतर बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या वेळी रश्मी देसाईची अरहान खानशी (Arhaan Khan) जवळीक वाढली होती. पण अरहानला मुलंही आहेत असे समजल्यानंतर तिचे अरहानसोबतचं नातंही (Arhaan Khan And Rashami) तुटलं. आता अभिनेत्री रश्मी देसाई ही सिंगल लाइफ एन्जॉय करत आहे. आणि तिच्या लाईफ अपडेट देखील सोशल मीडियावर शेअर करत असते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aditya Roy Kapur And Ananya Pandey | मुलगी अनन्या व आदित्यच्या अफेअरवर अभिनेते चंकी पांडेंनी सोडले मौन