‘तुझ्यात जीव रंगला’ मधील ‘वहिनीसाहेब’ झाल्या ‘आईसाहेब’ ! शेअर केली ‘ही’ खास पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुझ्यात जीव रंगला या मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारणी अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaonkar) हिनं या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळवली. तिला सर्वलोक वहिनीसाहेब म्हणून ओळखू लागले आहेत. धनश्री सध्या सोशलवर चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिनं दिलेली गुड न्यूज आहे.

धनश्री काडगावकर नुकतीच आई झाली आहे. तिनं एका मुलाला जन्म दिला आहे. खुद्द ॲक्ट्रेसनंच सोशलवरून याबाबत माहिती दिली आहे. सध्या तिच्या या पोस्टची खूप चर्चा सुरू आहे.

धनश्रीनं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं लिहिलं की, आम्हाला हे सांगण्यात फार आनंद होत आहे की, आमच्या जीवनात एका चिमुकल्या मुलाचं आगमन झालं आहे. मला मुलगा झाला आहे. मी आणि बाळ दोघंही सुखरूप आणि उत्तम आहोत. तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा यासाठी तुमचे आभार.

जेव्हा धनश्रीला कळालं की, ती आई होणर आहे तेव्हा तिनं तुझ्यात जीव रंगला ही मालिका सोडली होती. धनश्रीनं तिची ही पोस्ट शेअर केल्यानंतर सध्या ही पोस्ट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

धनश्रीच्या या पोस्टवर अनेकांनी अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. धनश्रीवर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.