‘या’ अभिनेत्रीनं सांगितला बुरखा सोडून बिकीनी घातल्याचा प्रवास !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस आणि कुंडली भाग्य फेम अंजुम फकीहने आपल्या लाईफमधील स्ट्रगल सांगितला आहे. अंजुम फकीहचा अ‍ॅक्ट्रेस होण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. याबाबत अंजुमनेच खुलासा केला आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जावं लागल्याचं सांगितलं. अंजुम रत्नागिरीची रहिवासी आहे.

अंजुम म्हणाली, “माझी फॅमिली खूपच रुढीवादी विचारांची आहे. आमच्या घरात टीव्ही पाहणंही चुकीचं असल्याचं मानलं जातं. माझ्या घरात तेव्हा टीव्ही आला जेव्हा मी 9 वीत होते, तेही मी खूप हट्ट केल्यानंतर माझ्या बाबांनी टीव्ही आणला. त्यामुळे माझे आजोबा दोन वर्ष घरी आलेच नाही.”

‘बुरखा आणि घर दोन्ही सोडलं’

अंजुम म्हणाली, “वडिलांची इच्छा होती की, मी शिकावं. 2009 मध्ये जेव्हा मॉडेलिंग करण्याविषयी सांगितलं तेव्हा ते खूप दु:खी झाले.” वडिलांनी सांगितले की, अंजुम जर शोबिजमध्ये गेली तर तिला घर सोडावं लागेल. अंजुम सांगते, “मी माझा बुरखा बाजूला ठेवला आणि बॅग घेऊन घर सोडलं.”

‘मुंबईत परफ्युम विकला’

पुढचा प्रवास सांगताना अंजुम म्हणते, “मी मुंबईत आल्यानंतर एका स्टोरमध्ये सेल्स एक्झिक्युटीवचं काम केलं आणि परफ्युम विकला. माझ्याकडे पैसे नव्हते. घरच्यांनीही कधी फोन केला नाही.”

‘बिकीनी घातल्यानंतर घरचे एक वर्ष बोललेच नाही’

अंजुम म्हणाली की, “माझी मॉडेलिंग असाइनमेंट गोव्यात होती. मला बिकीनी घालायची होती. जेव्हा मी हे घरी सांगितलं तेव्हा घरचे कोणीही एक वर्ष माझ्याशी बोललेच नाही.”

Visit : Policenama.com