‘ससुराल सिमर का’ फेम आशिष रॉय यांचं निधन ! सोशल मीडियावर मागितली होती आर्थिक मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ससुराल सिमर का फेम आशिष रॉय (Ashiesh Roy) यांचं आज निधन झालं आहे. आशिष दीर्घकाळापासून आजारी होते. समोर आलेल्या माहितीनुसार किडनी फेल झाल्यानं त्यांचं निधन झालं आहे. ते 55 वर्षांचे होते.

काही दिसवांपूर्वीच (लॉकडाउन काळात) आशिष रॉय यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आशिष आयसीयूमध्ये होते. त्यांची स्थिती खूप गंभीर होती. त्यांच्या शरीरात जवळपास 9 लिटर पाणी जमा झालं होतं. अनेक अवयव सुजले होते. कोरोनामुळं कोणतंही हॉस्पिटल त्यांना अ‍ॅडमिट करून घ्यायला तयार नव्हतं. खूप विनंती केल्यानंतर एका हॉस्पिटलनं भरती करून घेतलं. त्यांचं डायलिसिस सुरू होतं. त्यांच्याकडे उपचार करण्यासाठीदेखील पुरेसे पैसे नव्हते. त्यांनी मित्र आणि चाहत्यांकडे आर्थिक मदत मागितली होती.

दिल्लीच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या खात्यात पैसे टाकले होते. परंतु ते गरजेपेक्षा कमी होते. त्यांनी मदतीसाठी मित्र सूरज थापर आणि सलमान खानपर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना मदत न मिळाल्यानं ते हॉस्पिटलमधून घरी आले होते, अशीही वेळ त्यांच्यावर आली होती.

आशिष यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झलं तर त्यांनी ससुराल सिमर का, बनेगी अपनी बात, ब्योमकेश बख्शी, यस बॉस, बा बहूर और बेबी, मेरे अंगने में, कुछ रंग प्यार के ऐसे भी, आरंभ, अशा अनेट टीव्ही मालिकेत काम केलं आहे. आशिष यांनी टीव्ही व्यतिरिक्त हॉलिवूड सिनेमांची डबिंग केली आहे. ते एक व्हाईस ओव्हर आर्टीस्टही होते. त्यांनी सुपरमॅन रिटर्न्स, द डार्क नाईट, गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी, द लेजेंड ऑफ द टार्जन, जोकर अशा अनेक सिनेमांतील विविध भूमिकांसाठी डबिंग केली आहे.