‘या’ अभिनेत्यानं शेअर केला ‘अंडरवियर’मधील फोटो ! म्हणाला – ‘कपडे काढण्यासाठी मला…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही ॲक्टर करणवीर बोहरा (Karanvir Bohra) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे त्याचा फोटो आहे जो वेगानं सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत करणवीरनं मालदीवला जाणाऱ्या स्टार्सवर टीका केली आहे.

करणवीनं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. त्यानं क्लिक केलेला हा मिरर सेल्फी बाथरूममधील आहे. फोटोत करणवीर फक्त अंडरवियर मध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना त्यानं खास कॅप्शनही दिलं आहे. ज्यामधूनं मालदीवला फिरायला जाणाऱ्या लोकांना खास करून स्टार्सला त्यानं चिमटा काढला आहे.

फोटो शेअर करताना त्यानं लिहिलं की, मला कपडे काढण्यासाठी मालदीवला जाण्याची गरज नाही. करणवीरच्या फोटो सोबत त्याच्या कॅप्शननंही लोकांचं लक्ष वेधलं आहे. या फोटो सोबत त्यानं भला मोठा मेसेज लिहिला आहे.

करणवीरचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याच्या कॅप्शनचंही कौतुक केलं आहे. काहींनी करणवीरची ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर देखील केली आहे. सध्या करणवीरच्या या पोस्टची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे.