Video : मोनालिसानं धरला ‘चुनरी चुनरी’ गाण्यावर ठेका ! चाहत्यांना आठवली ‘बीवी नंबर 1’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  भोजपुरी सेंसेशन आणि टीव्ही अ‍ॅक्ट्रेस मोनालिसा (Monalisa) बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते जे नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले होते. यात ती बोल्ड बिकिनीत दिसली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं सोशलवर अटेंशन घेतलं आहे.

मोनालिसानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. मोनालिसा यात तिची कोस्टार श्रुती शर्मा सोबत मिळून चुनरी चुनरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं मोनालिसानं साडी नेसली आहे आणि नेहमीप्रमाणे त्याला बोल्डनेसचा तडकाही दिला आहे.

सलमान खानचा बीवी नंबर 1 हा सिनेमा 1999 साली रिलीज झाला होता. या सिनेमात त्याच्यासोबत करिश्मा कपूर आणि सुष्मिता सेन प्रमुख भूमिकेत होत्या. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हिट झाला होता.

मोनालिसाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचंही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली होती. मनी है तो हनी है, सरकार राज, गंगा पुत्र, काफिला असे तिचे काही बॉलिवूड सिनेमे सांगता येतील. मोनालिसा बिग बॉस 10 मध्ये झळकली होती. मोनालिसानं हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा अनेक भाषेतील सिनेमात काम केलं आहे. मोनालिसाचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. तिनं 125 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.