Video : ‘ड्रामा क्वीन’ राखीनं कपाळापासून पायापर्यंत पूर्ण अंगावर काढलं अभिनवचं नाव ! ॲक्टरची पत्नी रूबीना आणि अभिनेत्रीमध्ये ‘घमासान’

बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. घरात आल्यापासून ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कराणानं चर्चेत येत आहे. अनेकदा राखी अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) वरील तिचं प्रेम व्यक्त करताना दिसली आहे. परंतु आता राखीचं अभिनवसाठीचं प्रेम त्याची पत्नी रूबीना दिलैक (Rubina Dilaik) हिच्या घशाखाली उतरत नाहीये. फक्त अभिनवचं नाही तर घरातील इतरही सदस्य राखीच्या या वर्तनाला वैतागले आहेत.

राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. राखीनं अभिनव वरील प्रेम व्यक्त करण्यासाठी पूर्ण अंगावर अभिनवचं नाव लिहिलं आहे. कपाळापासून तर पायापर्यंत तिनं अभिनवचं नाव लिहिलं आहे. हे पाहून सारेच हैराण झाले. रूबीना, विकास आणि अलीसहित अनेक घरावाल्यांनी तिला असं करण्यास मनाई केली. रूबीनानं राखीच्या या वर्तनाला चीप एंटरटेन्मेंट म्हटलं. रूबीना म्हणते की, राखीनं तिची मर्यादा ओलांडली आहे. आता तिला हे सहन होणार नाही.

रूबीना राखीला म्हणते की, माझ्या पतीचा परमानंट टॅटू काढ मला काही फरक पडत नाही. असं करून तूच खराब दिसशील. राखी म्हणते की, सरळ बोटानं तूप निघत नाही तेव्हा बोट वाकड करावं लागतं. प्रेम मागून नाही मिळत हे हिसकावून घ्यावं लागतं. ती अभिनवला सुध्दा म्हणते की, आजवर कुणी तुझ्यासाठी असं केलं आहे का.

राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.