Women’s Day Special : भेटूयात Bigg Boss मध्ये सामिल झालेल्या ‘बॉस’ महिलांना, जेव्हा-जेव्हा महिला कंटेन्स्टंटने मारली बाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीचा सर्वांत चर्चित रिअ‍ॅलिटी शो ’बिग बॉस’ बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान होस्ट करतो. या सीझनमध्ये बहुतांश महिलांनीच बाजी मारली आहे आणि बिग बॉसची ट्रॉफी पटकावली आहे. वूमन्स डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्या बॉस लेडीजबाबत सांगणार आहोत, ज्यांनी बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. बिग बॉसमध्ये निवडलेले कंटेन्स्टंट एकत्र एका घरात तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहतात. या दरम्यान 24 तास ते कॅमेर्‍याच्या नजरेत असतात, त्यांची प्रत्येक हालचाल कॅमेर्‍यात कैद होते. त्यांना अनेक टास्कसुद्धा दिले जातात. शेवटी जो पब्लिकच्या व्हाेटने जिंकतो तोच बिग बॉसचा विनर ठरतो.

रुबीना दिलैक

नुकताच बिग बॉस 14 चा समारोप झाला आणि यावेळीसुद्धा बिग बॉसची ट्रॉफी पटकावणारी महिलाच होती. रुबीना दिलैकने बिग बॉस 14 ची बॉस लेडी बनून ट्रॉफी आपल्या नावावर केली आणि राहुल वैद्य शोचा रनरअप बनला.

दीपिका कक्कड

बिग बॉस सीझन 12 ची विनर होती दीपिका कक्कड. दीपिकाने अनेक मोठ्या सेलेब्सला मागे टाकत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली होती आणि बॉस लेडी बनून बाहेर पडली होती.

शिल्पा शिंदे

’बिग बॉस 11’ची विनरसुद्धा महिलाच होती, विशेष गोष्ट ही आहे की, रनरअपसुद्धा महिलाच होती. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने हीना खानला पराभूत करून बिग बॉस 11 ची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.

गौहर खान

गौहर खानने ’बिग बॉस 7’ ची ट्रॉफी जिंकली आणि तनिषा मुखर्जीला तिने पराभूत केले होते. गौहरचे खूप जास्त फॅन फॉलोईंग होते आणि तिने ज्याप्रकारे सर्व टास्क कम्प्लीट केले, लोकांनी तिला खूप पसंती दिली. गौहर खान बिग बॉस 14 मध्येसुद्धा सीनियर बनून आली होती. नुकताच गौहर खानने जैद दरबारसोबत विवाह केला आहे.

उर्वशी ढोलकिया

‘बिग बॉसचा 6वा’ सीझनसुद्धा महिला कंटेन्स्टंटने जिंकला होता. उर्वशी ढोलकिया शोची विनर होती. उर्वशीला सीरियल ’कसौटी जिंदगी की’ मधील कोमोलिकाच्या भूमिकेमुळे ओळखले जाते.

जुही परमार

‘बिग बॉस सीझन 5’ची विनरसुद्धा महिला कंटेन्स्टंट होती. टीव्ही अभिनेत्री जुही परमारने हा किताब जिंकला होता. महक चहलने जुहीला अटीतटीची टक्कर दिली होती.

श्वेता तिवारी

’बिग बॉस सीझन 4’ ची विनर श्वेता तिवारी होती. द ग्रेट खलीला मात देऊन श्वेता तिवारीने हा शो जिंकला होता. श्वेता तिवारी पहिली महिला होती जिने बिग बॉसचा किताब जिंकला होता.