Twitter वापरताय ? तर आता ‘हे’ फिचर तुमच्यासाठी ठरेल फायद्याचे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात Twitter चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यानुसार, ट्विटरकडून युजर्ससाठी नवे फिचर्स आणले जात आहे. डायरेक्ट मेसेजसाठी (DM)नव्या व्हाईस फिचरचे टेस्टिंग केले सुरु आहे. हे फिचर 17 फेब्रुवारीपासून भारत, ब्राझील आणि जपान या देशांतील युजर्ससाठी हळूहळू उपलब्ध केले जाणार आहे. या फिचरच्या मदतीने युजर्सला आता 140 सेकंदापर्यंत व्हॉईस मेसेज डायरेक्ट मेसेज (DM)पाठवता येऊ शकतो.

व्हाईस मेसेजिंगचे हे फिचर सध्या एँड्राईड आणि iOS या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या फिचरनुसार, आपण अगदी सोप्या पद्धतीने मेसेज पाठवू शकतो. त्यासाठी युजर्सला मेसेज रेकॉर्ड करण्यासाठी व्हाईस रेकॉर्डिंग आयकॉनवर टॅप करायला हवे. एकदा मेसेज झाला की पुन्हा एकदा टॅप करायला हवे. युजर्स हा व्हाईस मेसेज टाकण्यापूर्वी ऐकूही शकतात.

Android आणि iOS च्या युजर्ससाठी हे फिचर
ट्विटरवर व्हाईस DM पाठविण्याचे फिचर सध्या फक्त Android आणि iOS युजर्ससाठीच उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच युजर्स वेब ब्राऊजरच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्हाईस मेसेजला ऐकू शकतात. याबाबत ट्विटरकडून सांगण्यात आले, की या नव्या फिचरच्या माध्यमातून युजर्सला स्वत:ला एक्प्रेस करण्याचे आणखी माध्यम मिळणार आहे.

भारत महत्त्वपूर्ण मार्केट : ट्विटर
ट्विटरसाठी भारत एक महत्वपूर्ण मार्केट आहे. त्यामुळेच आम्ही इथं सातत्याने नव्या फिचर्सचे टेस्टिंग करत असतो. आम्ही DM मध्ये व्हाईस मेसेजेस् एक्सपेरिमेंटला देशात सुरुवात करत आहोत, असे ट्विटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष माहेश्वरी यांनी सांगितले.