आयएएस अधिकारी बनले ‘हमाल’

ADV

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था

केरळमध्ये आलेल्या जलप्रलयाला जगभरातून मदत होत असताना राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी देखील पुरग्रस्तांसाठी मदत करत आहेत. राज्यातून आणि जगभरातून मिळालेली मदत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सध्या मनुष्यबळाची गरज भासत आहे. यामुळे येथील काही आयएएस अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गर्व न राखता चक्क हमाल बनत तांदळाची पोती आपल्या खांद्यावरून उतरवून ठेवत माणुसकी दाखवून दिली आहे. सोशल मिडीयावर या दोन आयएएस अधिकाऱ्यांचे फोटो व्हायरल होत असून त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
[amazon_link asins=’B071JWBFDT,B078YW7FSC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88b90ad4-a4a4-11e8-9bd2-a1bd55918305′]

ADV

वायनाडचे जिल्हाधिकारी जी. राजामनीकियम आणि उप जिल्हाधिकारी एन.एस.के. उमेश यांनी आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करत तांदळाच्या गोण्या पाठीवरून उचलून कार्यालयामध्ये ठेवल्या. तर इदुक्की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जीवन बाबू हे कँपमध्ये लोकांना जेवण वाढत आहेत. तर केरळच्या आपत्ती निवारण खात्याच्या अधिकारी अंजली रवी या त्यांच्या लग्नाची तयारी सोडून पूरग्रस्तांची मदत करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. अंजली यांचे लग्न गेल्या शनिवारी होणार होते.

केरळमध्ये पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी कर्मचारी दिवसरात्र राबत आहेत. मात्र, पूर संकटच एवढे मोठे आहे की, राज्याचा कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांचे फोटो आयएएस असोसिएशनने ट्विटरवर पोस्ट केले आहेत. देशभरातून या दोन्ही अधिकाऱ्यांचे कौतूक होत आहे.