Uday Samant | दुसर्‍याचे वाईट व्हावे म्हणून देवीकडे प्रार्थना करणार्‍या माणसाकडे…, अंबादास दानवे यांना मंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

मुंबई : Uday Samant | मी 40 महिशासुरांचे मर्दन करण्याची मागणी देवीपुढे केली, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते (Shivsena leader) आणि राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी काल ठाण्यातील टेंभीनाका येथे देवीचे दर्शन घेतल्यानंतर दिली होती. दानवे यांच्या या वक्तव्यावर आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सामंत यांनी म्हटले की, असे अनेक अंबादास दानवे मी झेपवले आहेत.

दानवे यांना उपरोधिक टोला लगावताना उदय सामंत म्हणाले, दुसर्‍याचे वाईट व्हावे म्हणून देवीकडे प्रार्थना करणार्‍या माणसाकडे देव बघत असतो, की हा किती वाईट आहे. देव त्याचेच वाईट करतो. दानवेंनी त्यांचे विधान परिषदेचे पद जितकी वर्ष आहे ते सांभाळावे, त्यांचे विचार त्यांनी पोहोचवावे. देवी त्यांना चांगली बुद्धी देवो हीच माझी प्रार्थना.

सामंत (Uday Samant) यांनी म्हटले की, आमचे संपर्क अभियान मुंबईत चालू आहे, त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मला दिलीय. आज दोन मेळावे झाले दोन्ही मिळावे फार मोठे झाले. सभा घेणे हा लोकशाहीचा अधिकार आहे, शेवटी कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सभेला येणार्‍या लोकांची सुद्धा जबाबदारी आहे.

एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. अतिशय वेगाने ते काम करतात.
22 तारखेला आमची बैठक घेतली आणि 28 तारखेला भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar)
यांच्या संकल्पनेतील पंडीत दिनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar) संगीत महाविद्यालयासाठी 100 कोटी रुपये मंजूर केले.

अडीच वर्षांपूर्वी जी संकल्पना आमच्यासमोर आली, ती संकल्पना एकनाथ शिंदेंनी केवळ 2.5 महिन्यात प्रत्यक्षात उतरवली, म्हणूनच बुलेट ट्रेनपेक्षाही त्यांचा स्पीड फास्ट आहे.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या सभेला जी गर्दी होते, ती स्वर्गीय बाळासाहेबांच्या सभेसारखी असते.
म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो,
कारण एवढी लाखो लोकांची गर्दी सभांना होत आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका करताना सामंत म्हणाले,
आमच्याकडे दापोलीला काहीजण सभेसाठी आले होते, एखादा कोपरा पाहायचा, राष्ट्रवादीचे (NCP)
लोक भगवा झेंडा घेऊन जमवायचे आणि आम्हाला शिव्या द्यायच्या.

शिंदे गटाच्या (Shinde Group) दसरा मेळाव्याची (Dasra Melava) माहिती देताना उदय सामंत म्हणाले,
दसर्‍या मेळाव्यासाठी आमची चर्चा व्यवस्थित झाली.
दसरा मेळाव्याला मुंबईमधून विक्रमी लोक एकनाथ शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचे खरे समर्थन करण्यासाठी उपस्थित राहतील.

Web Title :- Uday Samant | i dont care ive beaten so many demons uday samant on ambadas danvey

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | उदय सामंतांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेची तुलना बाळासाहेबांच्या सभेसोबत, आदित्य ठाकरेंना नाव न घेता लगावला टोला

PFI Ban | शिंदे- फडणवीस सरकार रझा अकादमीवर बंदी घालण्याची शक्यता, केंद्राने पीएफआयवर बंदी घातल्यानंतर राज्यात हालचाली