Uday Samant On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना फक्त पाच मिनिटे भाषण करण्याची संधी मिळणे दु:खद; उदय सामंत यांची टीका

मुंबई : Uday Samant On Uddhav Thackeray | इंडिया आघाडीच्या (INDIA Aghadi) कालच्या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सूचना केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना फक्त पाच मिनिटे भाषण करण्याची संधी मिळाली, हे अतिशय दुःखदायक आहे. कुणाला वाटो न वाटो पण आमच्यासाठी ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यात उबाठा काँग्रेसमय होऊन नाना पटोले यांच्या आदेशानुसार नुसार काम करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे अशा शब्दांत खोचक टीका शिवसेना नेते (Shivsena Leader) उदय सामंत यांनी केली.(Uday Samant On Uddhav Thackeray)

कालच्या भाषणाची सुरुवातही तमाम हिंदू बंधू, भगिनींनो आणि मातांनो अशी का झाली नाही? असा प्रश्न करून सामंत यांनी सभेला फार गर्दी नव्हती. शिवाजी पार्क ऐवजी एखाद्या हाॅल मध्ये सभा घेतली असती तरी चालले असते, असे सामंत यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हीन दर्जाची टीका करणाऱ्या राहुल गांधींच्या बरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या
स्मारकाजवळ बसून आपण काय साध्य केले याचे उत्तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनतेसमोर
द्यावे लागेल, असे सांगून सामंत म्हणाले की मला काही प्रश्न उद्धव ठाकरे आणि उबाठाच्या नेत्यांना विचारायचे आहेत.
राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेले नाहीत? काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द
केल्यानंतर देशात जे वातावरण तयार झाले आहे. त्याचे समर्थन कालच्या मेळाव्यात राहुल गांधींसोबत बसलेले सर्वपक्षीय
नेते करणार का? याची उत्तरे मला उबाठा प्रमुखांकडून अपेक्षित आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On BJP | भाजपने पक्ष फोडताना पवार कुटुंबही फोडले; रोहित पवार यांची खंत

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)