Uddhav Thackeray-Bhagat Singh Koshyari | मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ पत्रावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची तीव्र नाराजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray-Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या (Assembly Speaker Election) मुद्यावरुन राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून विधानसभेला अध्यक्ष नाही. अध्यक्ष पदाच्या निवडीवरुन आता ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी लिहिलेल्या पत्रावर मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. पत्रातील भाषेवर राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. (Uddhav Thackeray-Bhagat Singh Koshyari)

‘पत्र वाचून मी व्यथित झालोय, निराश झालोय. तसेच पत्रात जी मुदत देण्यात आली होती,’ त्यावरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर राज्यपालांनी उत्तर दिलं आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले आणि ही प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) कळवलं होतं. विधानसभा अध्यक्षांची निवड प्रक्रियेबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला पत्र पाठवून उत्तर दिलं होतं. (Uddhav Thackeray-Bhagat Singh Koshyari)

नेमकं पत्रात मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं?

कायदे मंडळाने काय कायदे केले ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्रातून उत्तर दिलं होतं. ‘विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत. राज्यपाल महोदयांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये, कायदेशीर आहे की नाही? हे तपासण्याच्या उद्योगात पडू नये, आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ठणकावत सरकार निवडणूक घेण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणीही या पत्रातून केली होती.

 

 

दरम्यान, राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेतल्यास राष्ट्रपती राजवट (Presidential Reign) लागू करण्याची भीती असल्याने महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) निवडणूक टाळल्याची चर्चा आहे. आवाजी मतदानाने अध्यक्ष निवड घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कळवल्यानंतरही निवडणूक घेण्याची तयारी सत्ताधारी आघाडीने केली होती.
सरकारने पाठवलेल्या तिसऱ्या पत्राला राज्यपालांनी उत्तर दिलं.
त्यात काय संदेश दिला हे समजलं नाही. परंतु, राज्यपालांच्या
संमतीशिवाय निवडणूक घेण्यावरून सत्ताधारी आघाडीतच
मतभेद झाल्यानं या अधिवेशनात निवडणूक होणार नसल्याचं
जवळजवळ स्पष्ट झालं आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रावर राज्यपाल कोश्यारी नाराज असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे.

Web Title :- Uddhav Thackeray Bhagat Singh Koshyari | maharashtra governor bhagat singh koshyari upset over cm uddhav thackerays letter what is written in letter know in details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा; म्हणाले – ‘…तर नारायण राणे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो’

MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम? जामीन अर्जावर उद्या निर्णय

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक