Uddhav Thackeray | नाशकात ठाकरे गटात घरवापसी सत्र सुरु

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे यांच्या गटात गेलेल्या पदाधिकारी आणि आमदारांमध्ये नाराजी असल्याचे चित्र जिल्ह्यात तयार झाले आहे. शिंदे गटाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने धक्का दिला आहे. शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हा संघटक मंगला भास्कर (Mangala Bhaskar) यांनी ठाकरे गटात पुनर्प्रवेश केला आहे. पंधरा दिवसातच त्यांची ठाकरे (Uddhav Thackeray) गटात घरवापसी झाली आहे. त्यामुळे शिंदे गटातील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जून महिन्यात शिवसेनेत बंड केल्यापासून शिवसेनेला गळती लागली होती. एका मागे एक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी शिवसेना सोडून जात होते. त्यानंतर आता त्यांची पुन्हा घरवापसी म्हणजे शिवसेना प्रवेश होत आहे. नाशकात देखील महिला पदाधिकारी मंगला भास्कर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आता अवघ्या दोन आठवड्यातच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला राम राम केला आणि शिवसेना जवळ केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हा संघटक मंगला भास्कर या पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse),
खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यासोबत शिंदे
गटात गेल्या होत्या. त्यांच्याकडे शिंदे गटाची मोठी जबाबदारी देखील देण्यात आली होती.
मंगला भास्कर यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, ठाकरे गटाच्या नाशिकमधील काही नेत्यांनी
शिंदे गटाला दणका देत, मंगला भास्कर (Mangala Bhaskar) यांना ठाकरे गटात सामील करून घेतले. त्यामुळे नाशकात शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. तसेच सुहास कांदे (Suhas Kande) यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते देखील शिवसेनेत पुन्हा प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला प्रशासकीय बैठकिंना बोलावले जात नाही. मला वेगळे पाडण्यात आले आहे, असे सुहास कांदे म्हणाले आहेत.

Web Title :- Uddhav Thackeray | eknath shinde camp nashik district lady shivsena chief returns to uddhav thackeray group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gujarat Elections | निवडणुकीआधी पुन्हा बाहेर आले 2002 चे भूत; भाजपकडून गुजरात दंगलीतील दोषीच्या मुलीला तिकीट

Navi Mumbai ACB Trap | अलिबागच्या लाचखोर महिला तहसीलदार मिनल दळवींकडे सापडले कोट्यवधींचं घबाड