Uddhav Thackeray On Ajit Pawar | उद्धव ठाकरेंचा शिंदे- फडणवीसांना टोला, म्हणाले – ‘अजितदादा माझ्यावेळेला चांगले होते, पण…’

मुंबई : Uddhav Thackeray On Ajit Pawar | माझ्यावेळेला त्यांची अशी नाराजी पाहिली नाही. ते माझ्यासोबत चांगले होते. पण, ते चांगले काम करत होते म्हणून ज्यांच्या पोटात दुखत होते त्यांच्या उरावर अजितदादा आता बसलेले आहेत. त्यामुळे अजितदादा ज्यांच्या उरावर बसलेत त्यांनी नाराज व्हायला पाहिजे. आणि ज्यांनी त्यांना बसवलंय त्यांच्याही ते उरावर बसलेत त्यामुळे त्यांनीही नाराज व्हायला पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या नाराजी नाट्यावरून लगावला आहे. (Uddhav Thackeray On Ajit Pawar)

ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात औषधांअभावी रूग्णांचे मृत्यू होत असल्याच्या प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नाराजी नाट्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी वरील वक्तव्य केले. (Uddhav Thackeray On Ajit Pawar)

दरम्यान, काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. अनेक शासकीय बैठका आणि कार्यक्रमांना हजर राहणे अजित पवारांनी बंद केले होते. यामुळे राजकारणात विविध तर्कवितर्क व्यक्त होत होते. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही वक्तव्य हा गोंधळ आणखी वाढवणारी होती.

अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी नाराज आहेत, अशीही चर्चा सुरू असताना अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजप नेत्यांच्या (BJP Leader)
भेटीसाठी नवी दिल्लीला रवाना झाले होते. शिंदे आणि फडणवीस दिल्लीहून परतताच पालकमंत्री पदाची घोषणा
करण्यात आली.

त्यामध्ये अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री पद मिळाले. तेव्हा अनेकांना वाटले की, अजित पवार पुण्याच्या
पालकमंत्री पदासाठी नाराज होते. मात्र, अद्यापही अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलेला नाही.
दरम्यान, आजच्या पत्रकारा परिषदेत उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या याच नाराजी नाट्यावरून शिंदे- फडणवीसांना
टोला लगावला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray On Maharashtra Govt | ‘पेशंट टेबलावर आणि डॉक्टर दौर्‍यावर असा उथळ कारभार सध्या सुरु’; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात (व्हिडिओ)