Uddhav Thackeray on Devendra Fadnavis | देवेंद्रजी, तुम्हालाही परिवार आहे हे लक्षात ठेवा… अन्यथा तुम्हाला शवासन करावं लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा (व्हिडिओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray on Devendra Fadnavis | देवेंद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. काही व्हॉट्सअॅप चॅट बाहेर येत आहेत. मी त्यावर बोलणार नाही. अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही, फक्त झोपावं लागेल, असा गर्भित इशारा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. मुंबईतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis)
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी परिवाराबाबत संवेदनशील आहे. सूरज आणि शिवसैनिक (Shivsainik) माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाची मी काळजी घेईल. परिवाराबद्दल बोलू नका. अनेकांचे अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, असं सांगतानाच सूरजवर धाड टाकली. तो साधा शिवसैनिक आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis)
निवडणुकीत जमालगोटा द्यावा लागेल
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी (Covid Center Scam Case) सुरु असलेल्या कारवाईवरुन टीका केली. चौकशीला आम्ही घाबरत नाही. नियमाच्या पुढे जावून काही गोष्टी कराव्या लागतात असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्या काळात जे काही सर्व्हे झाले त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नेहमी पहिला क्रमांक आला ही यांची पोटदुखी आहे. भाजपच्या (BJP) एकही मुख्यमंत्र्यांचं नाव त्या यादीत नव्हतं. या पोटदुखीसाठी त्यांना या निवडणुकीत जमालगोटा द्यावा लागेल. यांना घोड्यांचेच औषध द्यावे लागेल. एकदाच कोटा व्यवस्थित साफ करावा लागेल, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
मुंबई पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी बैठक । छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, दादर – LIVE https://t.co/gyr4DQQwtz
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 24, 2023
तर नुसतं शवासन करावं लागेल
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, कोरोना काळातील घोटाळ्याच्या नावे सध्या बोभाटा सुरु आहे. सूरजच्या घरावर धाड टाकली. तो एक साधा शिवसैनिक आहे. ठाकरे कुटुंबाला धक्का असं बोललं जात आहे. यांच्या मनात किती भीती बसली आहे. मी पाटण्याला गेलो तर लगेच फडणवीस हे परिवार बचाओ बैठकीला गेलेत असं म्हणाले. या पातळीवर येऊ नका. देवेंद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. तुमच्या परिवाराचे काही व्हॉट्सअॅप चॅट बाहेर येत आहेत. त्यावर बोलावं लागलं तर नुसतं शवासन करावं लागेल. इतर आसनं तुम्हाला झेपणार नाहीत. त्यामुळे माझ्या परिवारावर बोलू नका. त्याबद्दल मी संवेदनशील आहे. संपूर्ण महाराष्ट्र, शिवसैनिक माझा परिवार आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी. आता तुमच्या कुटंबाची जबाबदारी कोणी दुसरं घेत असेल तर मला माहिती नाही.
तुम्ही नालायकच
आपला संपूर्ण देश हा देशातील संस्कारामुळे आणि देशवासियांच्या संयमामुळे चालला आहे. भाजपच्या हातून देश कधीच सुटला आहे. उद्धव ठाकरेंना तुम्ही खलनायक ठरवत आहेत. मी नायक आहे की खलनायाक हे जनता ठरवेल. पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला माहीत आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
हिंमत असेल तर…
चौकशी करायची असेल तर ठाणे महापालिकेची (Thane Municipal Corporation) करा.
भाजप आमदार संजय केळकर (MLA Sanjay Kelkar) यांनी ती मागणी केली आहे. पण फडणवीसांनाच महत्व नाही तर यांना किती असणार? हिंमत असेल तर नागपूर, पुणे पालिका (PMC) यासह काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या राज्यांच्या कारभाराची चौकशी करा. पीएम केयर फंडाचीही (PM Care Fund) चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. पीएम म्हणजे प्रभाकर मोरे केअर फंड (Prabhakar More Care Fund) आहे का? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
Web Title : Uddhav Thackeray on Devendra Fadnavis | shivsena uddhav thackeray on bjp devendra fadnavis covid centre scam mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Mastermind Behind Fake Army Recruitment Operation Apprehended in Joint Operation by Pune Police and Military Intelligence
- Pune Escapades: Uncover the Best Weekend Delights!
- Take A Road Trip To These Getaways Less Than Three Hours Away From Pune
- Exciting Weekend Activities in Pune: Comedy, Music, and Historical Plays Await!
- Weekend Watch: Pune – The Pride month surfaces, street food remains to be at the city’s core
- Apple Expanding Reach: Plans Underway to Bring Apple Card to India, Collaborating with Banks and Regulators
- India and US Collaborate to Send Indian Astronaut to International Space Station in 2024
- Unlocking Career Opportunities: Infosys Introduces Free AI Certification Training Program to Accelerate Professional Growth
- Indian Startups Navigate Funding Winter: Layoffs Surpass 25,000 as Companies Seek Cost-cutting Measures