Uddhav Thackeray Sabha In Pune | पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांसाठी उद्धव ठाकरेंची सभा, वेळ आणि ठिकाण ठरलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Uddhav Thackeray Sabha In Pune | महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे उमेदवार (Congress Candidate) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena UBT) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ही सभा बळ देणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी धंगेकर यांच्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची देखील सभा झाली आहे.(Uddhav Thackeray Sabha In Pune)

पुण्यात ११ मे रोजी नदीपात्रामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. राज्यामध्ये काँग्रेस उमेदवारांसाठी राहुल गांधी यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या सभा सर्वाधिक झाल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांसाठी उद्धव ठाकरे यांच्या सभा काँग्रेस उमेदवारांसाठी अनुकूल ठरण्याचा अंदाज आहे.

यापूर्वी पुण्यात महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि इतर नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. तसेच उद्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होणार आहे.

तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी आणि इतर नेत्यांच्या सभा झाल्या आहेत.
आता रवींद्र धंगेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे.

विशेष म्हणजे, उद्या १० तारखेला मनसे प्रमुख राज ठाकरे यांची महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात
येत आहेत. पाठोपाठ ११ तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांची सभा होणार आहे. या सभेत दोन्ही ठाकरे काय बोलणार, एकमेकांवर कोणती टिपण्णी करतात याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Gadkari Sabha In Pune | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Murlidhar Mohol | मुळा-मुठा होणार सुंदर आणि प्रदूषणमुक्त – मुरलीधर मोहोळ