Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शहाजीबापूंना टोला; म्हणाले – “महाराष्ट्रात पण झाडं, डोंगर, हाटेल आहे”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | शिंदे गटांनी बंड पुकारल्यानंतर सर्व आमदार सुरतवरुन गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. जवळपास दहा दिवसामध्ये अनेक राजकीय किस्से पाहायला मिळाले. दरम्यान, तेव्हा सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahaji Patil) यांच्या काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल.. सगळं ओक्के मध्येच.. या विधानाने राज्यभर चर्चा होऊ लागल्या. त्यामुळे शहाजीबापू एक चर्चेचा विषय ठरला. त्यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निशाणा साधला आहे.

 

शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. त्यावेळी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यावेळी त्यांनी आमदार शहाजीबापू पाटलांनाही टोला लगावला आहे. झाडी, डोंगार, हाटील महाराष्ट्रात नाही का? किती सुंदर आहे महाराष्ट्र. असं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

“ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्राच्या या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते. मला एक कळलंच नाही की मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही, प्रेम नाही. त्या मातीचं वैभव दिसलं नाही.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी स्वतः एक कलाकार आहे. त्याच्यावरूनही त्यावेळी चेष्टा झाली होती. पण मी गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे.
पंढरपूरच्या वारीची केली आहे आणि त्यावेळी मी जो महाराष्ट्र बघितला.
त्यावेळी पावसाच्या सुमारास मी ही सगळी फोटोग्राफी केली.
इतका नटलेला, थटलेला महाराष्ट्र, दऱ्याखोऱ्या छान फुलांनी बहरून जातात..
मी तर शहरी बाबू. तुम्ही तर ग्रामीण भागातले.
त्या ग्रामीण भागात राहून तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य दिसत नसल्याचे ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray mp sanjay raut on mla shahaji bapu patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा