Uddhav Thackeray | काही जागांवर तडजोड करावी लागेल, तयारी ठेवा; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 48 लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. गुरुवारी (दि.17) नाशिक आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा (Ahmednagar Lok Sabha Constituency) आढावा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. आपल्याला महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचं आहे. हे करत असताना काही जागांवर पक्षाला तडजोड करावी लागेल, त्याची तयारी ठेवा, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील (Nashik Lok Sabha Constituency) पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पक्षात फूट पडल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात कुठल्या विधानसभा मतदारसंघात (Assembly Constituency) आपल्या पक्षाची किती ताकद आहे? याचा आढावा त्यांनी घेतला. नाशिक मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. या बैठकीला उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना काही जागांवर आपल्याला तडजोड करावी लागणार आहे. त्यासाठी तयारी ठेवा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बूथ प्रमुख तसेच इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करुन संघटनात्मक ताकद वाढवा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याकडे उद्धव ठाकरेंचा कल असल्याचे पाहायला मिळत आहे.

सुजय विखे पाटलांचा पराभव करायचा आहे

गुरुवारी मातोश्रीवर (Matoshree) अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडली.
यावेळी अहमदनगरच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.
आगामी निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघात आपल्याला सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांचा
पराभव करायचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

या बैठकीमध्ये नगर जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा जागा लढवायच्या याबाबत ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार असो आपल्याला एकत्र मिळून ही
निवडणूक जिंकायची आहे. त्या उमेदवाराला साथ द्यायची आहे. सुजय विखे पाटलांचा आपल्याला पराभव करायचा आहे,
तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Dr. Amol Kolhe | विकासकामांसाठी अजित पवारांकडे जाण्यात काहीच गैर नाही- खासदार डॉ. अमोल कोल्हे