Uddhav Thackeray vs BJP | शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर, भाजपाची शिवसेनेवर टीका

मुंबई : Uddhav Thackeray vs BJP | शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी झाल्यानंतर आता शिंदे गट (Shinde Group) वेगळा झाला आहे. आता शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) सुद्धा बीकेसी मैदानावर (BKC Ground) तर शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. या मेळाव्यांना गर्दी जमविण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोठे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, असे वृत्त आहे की, काँग्रेसने (Congress) शिवसेनेकडे एक प्रस्ताव ठेवला असून या प्रस्तावानुसार शिवसैनिक (Shiv Sainik) राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेत सहभागी झाले तर काँग्रेस कार्यकर्ते शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील. आता या प्रस्तावावरून भाजपाने शिवसेना, काँग्रेसवर टीका सुरू केली आहे. मात्र, या प्रस्तावाबाबत अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. (Uddhav Thackeray vs BJP)

काँग्रेसने शिवसेनेला दिलेल्या या प्रस्तावावर टीका करताना भाजपाचे केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी म्हटले की, भारत जोडो यात्रेसाठी शिल्लक सैनिकांची कुमक तर शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (NCP) भरवशावर.
उद्धवराव, काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्रीपद बळकावून झाले.
आता दसर्‍याचे विचारांचे सोने पवार-सोनियांकडे गहाण. त्यापेक्षा शिल्लकसेना अधिकृतपणे त्यांच्याकडे आऊटसोर्स करा. (Uddhav Thackeray vs BJP)

दरम्यान, यावरून मनसेने (MNS) सुद्धा शिवसेनेवर टीका केली आहे. मनसेचे गजानन काळे (Gajanan Kale)
यांनी ट्विट केले आहे की, नवाब सेनेचा ’टोमणे मेळावा’ काँग्रेसच्या जीवावर होणार तर …
बुडत्याला काडीचा आधार… तरी म्हटलं नवाब सेनाप्रमुख, छोटे नवाब व त्यांच्या सेनेकडून पीएफआयबाबत
अधिकृत वक्तव्य अजून का नाही आले ते… हिरवी मशाल घेवून टोमणे मेळावा होणार तर …

Web Title :- Uddhav Thackeray vs BJP | bjp keshav upadhye slams uddhav thackeray led shivsena over dasara melava row sharad pawar sonia gandhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा