Ujjwal Nikam | उज्ज्वल निकम यांचे शिवसेनेला दिलासा देणारे विधान, 2.5 लाख शपथपत्रे खोटी असल्याच्या दाव्यावर म्हणाले, ‘शपथपत्रे ही…’

मुंबई : Ujjwal Nikam | ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन मुळ शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) संघर्ष सुरु आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने (Election Commission) ठाकरे गटाची (Thackeray Group) अडीच लाख शपथपत्रे (Affidavit) बाद केल्याचे वृत्त समोर आल्याने यावरून नवीन वाद सुरू झाला आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) इतरही नेत्यांनी विविध प्रतिक्रिया देत आरोप-प्रत्यारोप केले. तर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी मात्र शिवसेनेला दिलासा देणारे वक्तव्य केले आहे. ते नागपूरमध्ये एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

खरी शिवसेना कोणाची, हा वाद निवडणूक आयोगात गेल्याने दोन्ही गटांनी आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आयोगाकडे शपथपत्रे सादर केली होती. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने पक्षाचे पदाधकिारी, जिल्हा प्रमुख व नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारी व त्यांच्याच नेतृत्वाखालील सेना ही खरी असल्याचा दावा करणारी तब्बल दोन ट्रक भरून 11 लाख शपथपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. यापैकी अडीच लाख शपथपत्रे बाद झाल्याची चर्चा आहे. शपथपत्रांचा फॉरमॅट चुकीचा असल्याने ती बाद झाली असे म्हटले जात आहे.

या संदर्भात अ‍ॅड. उज्जवल निकम (Ujjwal Nikam) म्हणाले, शपथपत्रांचा फॉरमॅट चुकीचा असणे हा आरोप चुकीचा आहे. निवडणूक आयोगासमोर जो आक्षेप घेण्यात आला आहे. आयोगासमोर सादर करण्यात आलेली शपथपत्रे ही विहीत नमुन्यात नसल्यामुळे ती बेकायदेशीर ठरतात. मूलत: हा आरोप चुकीचा आहे.

निकम म्हणाले, कायद्याने जेव्हा एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीने करायला सांगितली असेल आणि त्या विशिष्ट पद्धतीने ते कृत्य केले नसेल तर दोन परिणाम शक्य असतात. पहिला परिणाम म्हणजे त्या गोष्टीत अनियमितता आहे आणि दुसरी शक्यता म्हणजे ती गोष्ट बेकायदेशीर असते. शपथपत्रे ही विहीत नमुन्यात नाहीत याचा अर्थ ती बेकायदेशीर होतात असे नाही.

उज्वल निकम (Ujjwal Nikam) म्हणाले, या शपथपत्रांच्या सत्यतेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास त्याचा
तपास करण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.
दुसरा महत्त्वाचा भाग असा की निवडणूक आयोगासमोर शपथपत्रावर पुरावे दाखल केले आहेत.
दोन्ही गटांनी धनुष्यबाण आणि पक्ष यावर दावा केला आहे.
यावर निर्णय घेण्यासाठी दोन्ही गटांनी शपथपत्रे दाखल केली आहेत.

निकम म्हणाले, या शपथपत्रांमधील मजकूर खोटा आहे किंवा शपथपत्रे खोटी आहेत असा कोणी सप्रमाणात
आरोप करुन निवडणूक आयोगाकडे दावा केला तर आयोगाला त्याच्या सत्यतेबद्दल खोलात शिरावे लागते.
या सगळ्या प्रक्रियेला बराच कालावधी लागण्याची शक्यता असते. दरम्यान, शिवसेनेचे वकील विवेक सिंग
(Advocate Vivek Singh) यांनी म्हटले की, यासंदर्भात आयोगाने कोणतीही माहिती दिलेली नाही.
आम्ही आयोगाने दिलेल्या फॉरमॅटनुसारच शपथपत्रे दिली असून, हे वृत्त चुकीचे आहे.

Web Title :- Ujjwal Nikam | real shivsena case ujjwal nikam reacts on ec rejects truckload of affidavits submitted by thackeray group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पोलिसांचा टिपर असल्याच्या संशयावरुन तरुणावर टोळक्याने तलवारीने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Mumbai Crime | धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने पत्नीला कारने चिरडलं; CCTV फुटेज आले समोर (व्हिडिओ)