Ujjwala Yojana | उज्ज्वला योजना 2.0 : जाणून घ्या कशी लाभदायक आहे ही सरकारी योजना आणि तुम्ही कसा घेऊ शकता लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ujjwala Yojana | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज उत्तर प्रदेशमध्ये एलपीजी कनेक्शन सोपवून उज्ज्वला योजनेच्या दुसर्‍या टप्प्याचा (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना – पीएमयूवाय) PMUY शुभारंभ केला. कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसोबत चर्चा केली. उज्ज्वला योजनेबाबत (Ujjwala Yojana) सविस्तर जाणून घेवूयात…

काय आहे पंतप्रधान उज्ज्वला योजना?
पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत (PM Ujjwala Yojana) सरकार दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन देते. या योजनेचा लाभ केवळ महिलाच घेऊ शकतात. अर्जदार महिलेचे वय किमान 18 वर्ष असावे. सोबतच घरात या योजनेंतर्गत कोणतेही एलपीजी कनेक्शन नसावे.

उज्ज्वला 1.0 ते उज्ज्वला 2.0 पर्यंतचा प्रवास
2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या उज्ज्वला योजना 1.0 च्या दरम्यान, दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून दिले जात होते. यानंतर, एप्रिल 2018 मध्ये या योजनेचा विस्तार करून यामध्ये आणखी सात श्रेणी (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती, पीएमएवाय, एएवाय, अति मागास वर्ग, चहा बाग, वनवासी, बेट) च्या महिला लाभार्थ्यांचा समावेश केला. सोबतच, तिच्या लक्ष्यात सुधारणा करून ते आठ कोटी एलपीजी कनेक्शनचे केले. हे लक्ष्य ठरलेल्या तारखेपूर्वी सात महिने अगोदर ऑगस्ट 2019 मध्ये साध्य करण्यात आले होते.

21-22 च्या केंद्रीय बजेटमध्ये पीएमयूवाय योजनेंतर्गत एक कोटी अतिरिक्त एलपीजी कनेक्शनच्या तरतुदीची घोषणा करण्यात आली होती. याचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या त्या कुटुंबांना जमा-मुक्त एलपीजी कनेक्शन प्रदान करणे आहे, ज्यांना पीएमयूवायच्या पहिल्या टप्प्यांतर्गत सहभागी करता आले नव्हते.

 

उज्ज्वला 2.0 मुळे काय होणार फायदा?

उज्ज्वला 2.0 अंतर्गत लाभार्थ्यांना जमा मुक्त एलपीजी कनेक्शनसह पहिले रिफिल आणि हॉटप्लेट निःशुल्क प्रदान केले जाईल.

सोबतच, यामध्ये नामांकनाच्या प्रक्रियेसाठी किमान कागदपत्रांची आवश्यकता असेल.
उज्ज्वला 2.0 मध्ये प्रवाशांना रेशन कार्ड किंवा निवास दाखला जमा करण्याची आवश्यकता नाही.

’कौटुंबिक घोषणा’ आणि ’रहिवाशी दाखल, दोन्हीसाठी स्वताचे पत्र पुरेसे आहे.

असा करा उज्ज्वला योजना 2.0 साठी अर्ज

https://www.pmuy.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

येथे ऑनलाइन अर्जाचा पर्याय निवडा

आता हे सिलेक्ट करा की, आता तुम्हाला कोणत्या कंपनीचे गॅस कनेक्शन हवे आहे.

यानंतर मागितलेली माहिती भरून सबमिट करा.

तुमची इच्छा असेल तर हा फॉर्म डाऊनलोड करून तो जवळच्या गॅस एजन्सी डिलरकडे सुद्धा जमा करू शकता.

Web Title :- Ujjwala Yojana | pm ujjwala yojana second phase launched by prime minister narendra modi get free lpg gas connection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indo-Tibetan Border Police | कडक सॅल्यूट ! उच्चाधिकारी बनलेल्या मुलीला पाहून PI वडिलांनं केला ‘सलाम’

Murder in Alandi | तरुणाचे हात-पाय बांधून फेकले इंद्रायणी नदीत, खून प्रकरणात FIR

Supreme Court | उमेदवारांची निवड निश्चित झाल्यानंतर 48 तासात गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करा – सुप्रीम कोर्ट