आश्चर्यकारक ! 3 आठवड्यांची गर्भवती असतानाच ‘ती’ पुन्हा राहिली गर्भवती

पोलीसनामा ऑनलाइन – ब्रिटन येथील राहणाऱ्या एका महिलेबद्दल एक आश्चर्यकारक अशी घटना समोर आली आहे. तर अनेक वर्षानंतर ती महिला गर्भवती राहिली होती. तिला डॉक्टरांनी सांगितलं की ती गर्भवती आहे म्हणून त्याक्षणी ती आनंदात वाहून गेली. रॉबेका रॉबर्ट्स असे त्या महिलेचे नाव आहे. रॉबेका ही ब्रिटनची रहिवासी आहे. ज्यावेळी प्रथम सोनोग्राफी चेक केली. त्यावेळी बाळाची तब्येत आणि योग्य प्रमाणात वाढ होत आहे असे कळले. त्यानंतर बाराव्या आठवडी ती महिला सोनोग्राफी तपासणी करायला गेली त्याक्षणी तिला आणि डॉक्टरांना सुद्धा एक मोठा धक्काच बसला. कारण त्या महिलेच्या गर्भामध्ये आणखी एक बाळ असल्याचं समोर आलं आहे.

तिने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र या जुळ्या मुलांचा गर्भ एकाच वेळी राहिला नसल्याने त्यातील १ हे दुसऱ्यापेक्षा ३ आठवड्यांनी छोटं आहे. रॉबेकाला एक मुलगा व मुलगी असून तिने त्यांची नावे नोआ व रोसॅली ठेवली आहेत. त्या दोघांची जन्मतारिख सारखीच असली तरी रोसॅली ही नोआ पेक्षा तीन आठवड्यांनी लहान आहे. तसेच आता जे आणखी बाळ एक बाळ समोर आले आहे. ते बाळ पहिल्या बाळापेक्षा ३ आठवड्यांनी लहान होतं. म्हणजेच ती ३ आठवड्यांची गर्भवती असतानाच ती पुन्हा गरोदर राहिली.

दरम्यान, रॉबेका रॉबर्ट्सला सुरुवातीच्या दरम्यान हे कसे झाले तेच समजत नव्हते. परंतु, डॉक्टरांनी असे प्रकार लाखात एकदा होतात असे सांगितले आहे. पहिली गर्भधारणा झाल्यानंतर शरीरात काही दिवसांनी पुन्हा गर्भ राहतो आणि अशा प्रकारे जुळी मुलं जन्माला येण्याचे प्रमाण लाखो जुळ्यांमध्ये एक असते. असे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे रॉबेकाची केस ही दुर्मिळातील दुर्मिळ केस होती असे स्पष्ट दिसून येते.