दुर्दैवी ! उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जणांचा मृत्यु

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – उल्हासनगर  (ulhasnagar ) येथील साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून त्यात ७ जणांचा मृत्यु झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ कुटुंबातील लोकांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या इमारतीची पहाणी केली. तसेच मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

पुनीत बजोमल चांदवाणी (वय १७), दिनेश बजोमल चांदवाणी (वय ४०), दीपक बजोमल चांदवाणी (वय ४२), मोहिनी बजोमल चांदवाणी (वय ६५), कृष्णा इंदुचंद बजाज (वय २४), अमृता इनुचंद बजाज (वय ५४), लवली बजाज) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

उल्हासनगरमधील नेहरु चौक परिसरात साई शक्ती नावाची एक पाच मजली इमारत आहे. या इमारतीत एकूण २९ फ्लॅट्स आहेत. २८ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास या इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. इमारतीच्या ढिगार्‍याखालून आतापर्यंत ५ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यु झाला आहे.

उल्हासनगरमधील या महिन्याभरातील ही तिसरी दुर्घटना आहे. गेल्याच आठवड्यात मोहिनी पॅलेस इमारतीमध्ये ही अशी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये ५ जणांचा मृत्यु झाला होता.

Also Read This : 

Pune Crime News : प्रियकराने लग्न करण्यास केली टाळाटाळ; नैराश्यातून 23 वर्षीय पूर्णा चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगर परिसरातील घटना

 

गरोदरपणात खावीत ‘ही’ फळे ; होतील ‘हे’ खास फायदे

 

Coronavirus : चीन नव्हे तर अमेरिकेतून कोरोनाचा फैलाव, ‘ड्रॅगन’चा अमेरिकेवर पलटवार

 

उन्हाळ्यात ब्लड प्रेशर सांभाळा

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

 

केस दाट, लांब, मजबूत होण्यासाठी ‘हे’ करा !