Lunar Eclipse 2020 : चंद्रग्रहणाचा 12 राशींवर काय परिणाम होणार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 5 तारखेला चंद्रग्रहण होणार आहे. जसा या ग्रहणाचं खगोलशास्त्रीय आणि वैज्ञानिकांसोबतच ज्योतिषशास्त्रात देखील या ग्रहणाचे महत्त्व आहे. या दिवशी चंद्राचं प्रत्येक राशीत असणारं स्थान आणि त्याचा परिणाम कसा होणार आहे जाणून घ्या.

मेष – चंद्र नवव्या घरात असून हे ग्रहण मेष राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. मन थोडं विचलित झाले तरी प्रगतीपथावर वाटचाल कराल.
वृषभ – चंद्र आठव्या घरात असणार असून यावेळी या राशींचे लोक कोणतेही नवी काम सरु करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी हा काळ थोडासा प्रतिकूल असेल. तसेच ग्रहण काळात या राशींच्या लोकांना संसर्गाचा होण्याचा धोका उद्भवू शकतो.
मिथुन – चंद्र सातव्या घरात असल्याने जोडीदारासोबत नात्याला उभारी मिळेल. परिणाम शुभ मिळतील. घाईत कोणतेही निर्णय घेऊ नका अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.
कर्क – चंद्र सहाव्या घरात असेल. ज्यामुळे भावनिक ऊर्जा आणि उत्साह वाढेल. आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्याव लागेल. या राशींच्या लोकांना येत्या काळात यश मिळण्याची संभावना आहे.
सिंह – चंद्रग्रहण पाचव्या घरात होईल, ज्यामुळे आपल्याला शुभ परिणाम खास करून प्रेमसंबंधित प्रकरणांमध्ये आपल्याला आपल्या भूतकाळाचा प्रत्येक वाद मिटविण्याची संधी मिळेल.
कन्या – कौटुंबिक प्रश्न सोडवाल. जमीन खरेदी व्यवहारात लक्ष द्या. प्रत्येक बाबतीत काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या.
तूळ – आपलं धैर्य वाढल्याने धाडस कराल जे तुम्हाला कार्यक्षेत्रात यश मिळवता येईल. व्यवसायिकांनी जोखीम स्वीकारू नये अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल.
वृश्चिक – कौटुंबिक आणि आर्थिक जीवनात आघाडीवर असाल. खर्च हाताबाहेर गेल्याने मोठं आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.
धनु – धनु राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण खूप महत्त्वाचं असणार आहे. आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. खाण्यापिण्याची काळजी घ्या. योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मकर – वैवाहिक जीवनावर या ग्रहणाचा परिणाम दिसून येईल. जोडीदारासोबत वाद उद्भवतील.
कुंभ – उत्पन्न वाढीबरोबरच सन्मान देखील वाढणार आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका.
मीन – ध्येय डोळ्यासमोर ठेवून अधिक कष्ट करावे लागेल. इच्छा आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.