तुमच्या घरात सुद्धा असेल गाडी तर वाचा ही बातमी, एक एप्रिलपासून डम्प होतील 80 हजारपेक्षा जास्त गाड्या

बरेली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या प्रस्तावित नवीन स्क्रॅप धोरणाचा परिणाम जिल्ह्यातील 80 हजारपेक्षा जास्त वाहनांवर पडेल. बजेटमध्ये स्क्रॅप धोरणाच्या घोषणेनंतर परिवहन विभागाने जुन्या वाहनांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. एप्रिलपासून ही वाहने रस्त्यावरून हटवण्याचे काम सुरू होईल. नवीन स्क्रॅप धोरणाचा सर्वात जास्त परिणाम दुचाकी वाहनांवर होणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनुसार 20 वर्ष जुन्या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या दोन तृतीयांश पेक्षा जास्त आहे.

काही दिवसांपूर्वीच 15 वर्ष जुन्या वाहनांचे रजिस्ट्रेशन निलंबित करत परिवहन विभागाने त्यांचे री-रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले होते. यानंतर अनेक वाहन मालकांनी रजिस्ट्रेशन वैधता वाढवण्यासाठी अर्जही दिले आहेत. कोणतीही माहिती न मिळाल्याने दोन हजारच्या जवळपास अशा वाहनांची रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आली. नवीन स्क्रॅप धोरण लागू होताच मोठ्या संख्येने जुनी वाहने रस्त्यावरून हटवली जातील.

महिन्याच्या अखेरपर्यंत येईल गाईडलाइन
बजेटमधील घोषणेनंतर आतापर्यंत याबाबतीत अजूनपर्यंत कोणतीही गाईडलाइन परिवहन विभागाला मिळालेली नाही. मात्र, यापूर्वी जुन्या वाहनांचा डाटा जमवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महिन्याच्या अखेरपर्यंत गाईडलाइन येण्याची शक्यता आहे.

जुन्या वाहनांमुळे वाढतेय प्रदूषण
रस्त्यावर धावत असलेली जुनी वाहने प्रदूषणाचे मोठे कारण आहेत. ही वाहनांमधून मोठ्याप्रमाणात धुर निघत आहे. यामुळे एनजीटीने सुद्धा अशी वाहने हटवण्याबाबत म्हटले होते.

एआरटीओ प्रशासन आरपी सिंह यांनी सांगितले की, नव्या स्क्रॅप धोरणासंबंधी आतापर्यंत कोणतीही गाईडलाइन मिळालेली नाही. मात्र, जुन्या वाहनांची माहिती तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आदेश मिळताच जुन्या वाहनांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल.